निवडणूक काळात समन्वय ठेवा

By Admin | Updated: September 18, 2014 00:39 IST2014-09-18T00:39:13+5:302014-09-18T00:39:13+5:30

अधिकार्‍यांच्या बैठकीत बुलडाणा जिल्हाधिका-यांचे निर्देश.

Keep coordination during the election period | निवडणूक काळात समन्वय ठेवा

निवडणूक काळात समन्वय ठेवा

बुलडाणा: सण - उत्सवाच्या काळात निवडणूक आचारसंहिता व निवडणूक असल्याने सर्वांसाठी कसोटीचा काळ असला तरी समन्वय आणि एकत्रित काम यांच्या सहाय्याने विधानसभा निवडणूक पार पाडावी लागणार आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर यांनी आज येथे केले.
विधानसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर आज जिल्हय़ातील अधिकार्‍यांची बैठक येथे नियोजन भवन सभागृहात झाली. त्यावेळी ते बोलत होते.
या बैठकीस जिल्हा पोलिस अधीक्षक श्यामराव दिघावकर, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख, अप्पर जिल्हाधिकारी चिंतामण जोशी, निवासी उ पजिल्हाधिकारी ङ्म्रीकांत देशपांडे, अपर पोलिस अधीक्षक श्‍वेता खेडकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रमेश घेवंदे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर आदींची उ पस्थिती होती.
यावेळी सर्व अधिकार्‍यांना आदर्श आचारसंहितेबाबत प्रशिक्षण देण्यात आले. सभेसाठी परवानगी देताना सर्वांना समान धोरण ठेवावे त्याचप्रमाणे विङ्म्रामगृहात निरीक्षकांसाठी राखीव कक्षानंतर शिल्लक कक्ष प्रथम येणारा प्रथम या तत्त्वावर देण्यात यावा, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.
फिरत्या वाहनावर प्रचारावर बंदी आहे. वाहन एका जागी थांबवून ध्वनिक्षेपक वाजवावा अशी तरतूद आहे. याचा भंग करणारी वाहने जप्त करण्यात यावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी बुलडाणा किरण कुरुंदकर यांनी यावेळी दिले. सिंदखेडराजा येथील विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी विवेक घोडके यांनी यावेळी सादरीकरण केले. जिल्हय़ातील सातही विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तसेच पोलिस दलाचे अधिकारी आणि अन्य कार्यालय प्रमुख या बैठकीत उपस्थित होते.

** माध्यम कक्षाचे उद्घाटन
जिल्हाधिकारी कार्यालयात अद्ययावत अशा माध्यम कक्षाचे आज जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

Web Title: Keep coordination during the election period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.