वाहनाच्या धडकेत कोथळीतील युवक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 00:24 IST2017-11-01T00:24:30+5:302017-11-01T00:24:38+5:30
नांदुरा : वडनेर भोलजीनजीक नांदुरा -मलकापूर मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत कोथळी येथील ३२ वर्षीय नितीनकुमार सातव (पाटील) यांचा मृत्यू झाला. ३0 ऑक्टोबरला रात्री साडेदहाच्या सुमारास हा अपघात झाला होता.

वाहनाच्या धडकेत कोथळीतील युवक ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदुरा : वडनेर भोलजीनजीक नांदुरा -मलकापूर मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत कोथळी येथील ३२ वर्षीय नितीनकुमार सातव (पाटील) यांचा मृत्यू झाला. ३0 ऑक्टोबरला रात्री साडेदहाच्या सुमारास हा अपघात झाला होता.
दुचाकीने तो नांदुरा येथून मलकापूरकडे जात असताना हॉटेल सहयोग जवळ हा अपघात झाला. एमएच-२८-एएम-७६५३ द्वारे ते दुचाकीवर जात असताना अज्ञात वाहनाने त्यांना जबर धडक दिली. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले होते. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. गेल्या दोन दिवसापूर्वीच त्यांना दुसरा मुलगा झाला होता सोबतच ऑक्टोबर महिन्यातच त्यांचा जन्मदिवसही झाला होता.
मात्र यादरम्यानच काळाने अपघाताच्या रुपाने त्यांच्यावर झडप घातली. याप्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल श्रीकृष्ण मोरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून नांदुरा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात अप.क्र.५१२/२0१७ भादंवि कलम २७९, ३0४ अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल रवींद्र सोळंके हे करीत आहेत.