शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

धामणगाव परिसरात करवंद बहरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:34 IST

चैत्र महिन्यापासून या आंबटगोड काटेरी करवंदांच्या जाळ्या पसरलेल्या असतात. पांढऱ्या फुलांची गळती झाल्यावर हिरव्या रंगाची करवंदे लागतात. सध्या कडक ...

चैत्र महिन्यापासून या आंबटगोड काटेरी करवंदांच्या जाळ्या पसरलेल्या असतात. पांढऱ्या फुलांची गळती झाल्यावर हिरव्या रंगाची करवंदे लागतात. सध्या कडक निर्बंध असल्याने शेतकरी ते घेऊन शहरासह ग्रामीण भागात येऊ शकत नाहीत.

पिकल्यावर त्याचा रंग काळा होतो.परिसरातील लोक रखरखत्या उन्हाची पर्वा न करता हा रानमेवा जमा करतात. काही काळापूर्वी ही करवंदे पाच रुपयांना छोटे माप व दहा रुपयाला मोठे माप विकले जात होते. यातून काही लोकांना रोजगार मिळत असे. प्रचंड जंगलतोड व वणव्यामुळे करवंदाची झाडे दिवसेंदिवस कमी होत चालली आहेत. मात्र, यावर्षी कोरोनासारखे संकट आल्यामुळे आणि त्यातच संचारबंदी व ताळेबंदी यामुळे करवंदे व रानमेव्याची चव दुर्मीळ झाली आहे.

उन्हाळ्याचे आगमन होताच करवंदे व इतर रानमेवा बाजारात येतो. यामध्ये कैरी, चिंच, जांभळे आदी डोंगरदऱ्यामध्ये तयार झालेला रानमेवा बाजारात दाखल होत असे. या करवंदे व रानमेवा यामुळे लोकांना रोजगार मिळत असतो. मात्र, यंदा कोरोना संकटामुळे करवंदे व रानमेवा दुर्मीळ झाल्याचे चिन्ह निर्माण झाले आहे. रुचकर, चविष्ट, स्वस्त व औषधी असलेल्या या करवंदे व रानमेव्याची अनेकांना भुरळ पडत असते.

अनेकांचा राेजगार बुडाला

डोंगरातील रानमेवा हे लोकांचे या उन्हाळ्याच्या दिवसांत उत्पन्नाचे साधन असते. डोंगरदऱ्यातील करवंदे व रानमेवा तयार झाला असून त्याची ताळेबंदीमुळे विक्री होत नाही. त्यामुळे या फळांची चव सध्या दुर्मीळ झाली आहे. या रानमेव्याची लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांची मागणी असते. औषधी गुणधर्म असणारी करवंदे यंदा कडक निर्बंधामुळे शहरातील नागरिकांना मिळत नसल्याचे चित्र आहे़