पुतण्याकडून काकाचा खून

By Admin | Updated: June 26, 2015 01:33 IST2015-06-26T01:33:26+5:302015-06-26T01:33:26+5:30

घरगुती वादातून झाली हत्या; लोणार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

Kaka's blood from the nephew | पुतण्याकडून काकाचा खून

पुतण्याकडून काकाचा खून

लोणार (जि. बुलडाणा) : घरगुती वादातून हाणामारी होऊन पुतण्याने काकाचा खून केल्याची घटना तालुक्यातील रायगाव येथे २५ जून रोजी दुपारी १.३0 वाजता दरम्यान घडली. तालुक्यातील रायगाव येथील मारुती नामदेव तिडके (४५) हा पुतण्या लक्ष्मण विश्‍वास तिडके (२५) याच्या कुटुंबास त्रास देत होता. गुरुवारी दुपारीदेखील मारुतीने लक्ष्मणसोबत वाद घालून मारहाण केली. यादरम्यान लक्ष्मणने चुलता मारुतीवर तलवारीचे सपासप वार केले. यामध्ये तो तिडके जागीच मरण पावला. याप्रकरणी लोणार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वृत्त लिहीपर्यंत आरोपी लक्ष्मण तिडके हा स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाला होता.

Web Title: Kaka's blood from the nephew