जाळपोळप्रकरणी महिलेस न्यायालयीन कोठडी
By Admin | Updated: February 18, 2015 01:07 IST2015-02-18T01:07:38+5:302015-02-18T01:07:38+5:30
मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे येथील प्रकरण.

जाळपोळप्रकरणी महिलेस न्यायालयीन कोठडी
मोताळा (जि. बुलडाणा) : तालुक्यातील धामणगाव बढे येथील वाहने जाळपोळ व गावठी बॉम्ब प्रकरणात अटकेत असलेली मुख्य सूत्रधार संगीता पाटील (बोराडे) या महिलेला १५ दिवसाची न्यायालयीन कोठडी १७ फेब्रुवारी रोजी देण्यात आली. धामणगाव बढे येथील परवेज अबूबकर पटेल यांच्या घरासमोर पार्कींग केलेली दुचाकी व स्कार्पिओ वाहनाला आग लावून ही वाहने अज्ञात व्यक्तीने २ जानेवारीच्या रात्री जाळली होती. तर त्याच रात्री पटेल यांच्या नवीन बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमध्ये जिवंत सुतळी बॉम्ब लावून नुकसान करण्याचा प्रयत्न झाला होता. या प्रकरणी ७ फेब्रुवारी रोजी मुंबई येथील सिनेजगताशी संबधीत संगीता शिवाजी पाटील (बोराडे) हिला धामणगाव बढे पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले होते. तिला १0 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयाने संगीता पाटील हिच्या पोलीस कोठडीत १६ फेब्रुवारीपर्यंत वाढ करण्याचे आदेश दिले होते. सोमवारी १६ फेब्रुवारी रोजी पुन्हा धा. बढे पोलिसांनी संगीता पाटील हिला न्यायालयासमोर हजर केले असता, १५ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली गेल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.