ज्वारीचा पेरा वाढला

By Admin | Updated: July 30, 2014 00:02 IST2014-07-30T00:02:23+5:302014-07-30T00:02:23+5:30

मागच्या वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत ६८ टक्के पेरण्या झाल्या असून पाऊस लांबल्याने ज्वारीचा पेरा ६ पट वाढल्याचा दिसून येत आहे.

Jowar sowing increased | ज्वारीचा पेरा वाढला

ज्वारीचा पेरा वाढला

खामगाव : तालुक्यात मागच्या वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत ६८ टक्के पेरण्या झाल्या असून पाऊस लांबल्याने ज्वारीचा पेरा ६ पट वाढल्याचा दिसून येत आहे. सध्यस्थितीत पेरण्या चालु असुन आणखी ज्वारीचा पेरा वाढण्याची शक्यता आहे. आतापर्यंत एकूण ५0 हजार ७५0 हेक्टर पेरणी झाली आहे. खामगाव तालुक्यात मागच्या वर्षी १५ जुलै २0१३ पर्यंत एकूण ७८ हजार १५0 हेक्टर क्षेत्रावर पेरणी आटोपली होती. मात्र यंदा पाऊस लांबल्याने गेल्या १५ दिवसापासून अधूनमधून पेरणी सुरु आहे. आतापर्यंत गतवर्षीच्या तुलनेत फक्त ६८ टक्के पेरणी झाली आहे. मागच्यावर्षीच्या ७८ हजार १५0 हेक्टर पेरणीच्या मानाने यावर्षी आज २८ जुलै पर्यंत फक्त ५0 हजार ७५0 हेक्टर पेरणी झाली आहे. गतवर्षी तालुक्यात फक्त ३५0 हेक्टरवरच ज्वारीची पेरणी झाली होती. मात्र यावर्षी ६५ टक्क्यामध्ये २१५५ हेक्टर ज्वारीची लागवड झाली आहे. ज्वारीचा ६ पट पेरा वाढल्याचे दिसून येते.
 

Web Title: Jowar sowing increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.