शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
4
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
5
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
6
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
7
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
8
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
9
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
10
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
11
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
12
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
13
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
14
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
15
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
16
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
17
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
18
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
19
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
20
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका

जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्य़ाची सिंदखेड राजात जय्यत तयारी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 12:50 AM

बुलडाणा: राष्ट्रमाता माँ जिजाऊंच्या १२ जानेवारी रोजी होणार्‍या जन्मोत्सव सोहळ्य़ानिमित्त सिंदखेड राजा नगरीसह जिजाऊ सृष्टीवर विविध कार्यक्रम सध्या सुरू असून, यावर्षीच्या या सोहळ्य़ास छत्रपती तथा सातार्‍याचे खासदार उदयनराजे भोसले, छत्रपती इंजिनिअर बाबाजीराजे भोसले (तंजावर, तामिळनाडू), कोल्हापूरचे खासदार छत्रपती युवराज संभाजीराजे भोसले उपस्थित राहणार आहेत.

ठळक मुद्देराजवाड्यासह जिजाऊ सृष्टीवर विविध कार्यक्रमांची रेलचेल 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: राष्ट्रमाता माँ जिजाऊंच्या १२ जानेवारी रोजी होणार्‍या जन्मोत्सव सोहळ्य़ानिमित्त सिंदखेड राजा नगरीसह जिजाऊ सृष्टीवर विविध कार्यक्रम सध्या सुरू असून, यावर्षीच्या या सोहळ्य़ास छत्रपती तथा सातार्‍याचे खासदार उदयनराजे भोसले, छत्रपती इंजिनिअर बाबाजीराजे भोसले (तंजावर, तामिळनाडू), कोल्हापूरचे खासदार छत्रपती युवराज संभाजीराजे भोसले उपस्थित राहणार आहेत.मराठा सेवा संघातर्फे १९९४ पासून या सोहळ्य़ाचे आयोजन करण्यात येत असून, अल्पावधीतच सोहळ्य़ाची व्याप्ती वाढल्यामुळे जालना रोडवरील जिजाऊ सृष्टीवर लाखो जिजाऊ भक्तांच्या उपस्थितीत हा सोहळा दरवर्षी पार पडत आहे. या निमित्त सिंदखेड राजा येथे ३ जानेवारीपासून जिजाऊ सृष्टीवर सावित्री-जिजाऊ दशरात्रोत्सव सुरू झाला आहे. १२ जानेवारीला या दशरात्रोत्सवाचा राष्ट्रमाता माँ जिजाऊ यांच्या जन्मदिनी समारोप होतो. या निमित्त ११ जानेवारीच्या पूर्वसंध्येला सायंकाळी लखुजीराजे जाधव यांच्या राजवाड्यावर दीपोत्सवाचे सायंकाळी आयोजन करण्यात आले असून, शहर परिसरातील महिला एक दीप राजवाडा परिसरात लावणार आहे. त्यानंतर ४२0 मशालींचा समावेश असलेली मशाल यात्रा निघणार आहे. १२ जानेवारीला दिवसभर कार्यक्रमांची रेलचेल असणार असून, दुपारी ३ ते ६ या कालावधीमध्ये जिजाऊ सृष्टीवरील शिवधर्म पीठावर मुख्य कार्यक्रमास प्रारंभ होईल.या कार्यक्रमास छत्रपती उदयनराजे भोसले, छत्रपती इंजिनिअर बाबाजीराजे भोसले आणि छत्रपती युवराज संभाजीराजे भोसले यांच्यासह नुकताच लोकसभेचा राजीनामा दिलेले नाना पटोले, छत्रपती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष स्वप्निल खेडेकर (न्यूयॉर्क), मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष इंजिनिअर विजय घोगरे, महासचिव इंजिनिअर मधुकर मेहकरे यांच्या उपस्थितीत या सोहळ्य़ाच समारोप होणार आहे. दरम्यान, सायंकाळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अँड. पुरुषोत्तम खेडेकर यांचे समारोपीय भाषण होईल. या कार्यक्रमानिमित्ताने विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात येऊन शेवटी आतषबाजीने  या जन्मोत्सव सोहळ्य़ाचा समारोप होईल. त्या दृष्टीने जिजाऊ सृष्टीवर सध्या जय्यत तयारी सुरू असून, आतापासून नागरिक सिंदखेड राजा नगरीत पोहोचत आहे.

सूर्याेदयी महापूजा१२ जानेवारीला राजवाड्यावर मराठा सेवा संघाच्या ३२ कक्षांमधील प्रमुख जोडप्यांच्या हस्ते सूर्याेदयी राजवाड्यात महापूजा होईल. सात वाजता वारकरी दिंडी सोहळा शिवभक्त परायण गंगाधर महाराज कुरुंदकर यांच्या नेतृत्वात राजवाडा ते जिजाऊ सृष्टीपर्यंत निघेल. आठ ते दहा वाजेदरम्यान जिजाऊ जन्मोत्सवाचे कीर्तन होईल. प्रारंभी आ. शशिकांत खेडेकर,जि. अध्यक्ष उमा तायडे यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल.

टॅग्स :sindhaked raja rajwadaसिंदखेडराजा राजवाडाjijau shrusti, sindhaked rajaजिजाऊ सृष्टी, सिंदखेड राजा