ज्वेलर्समधून चोरट्याने भरदिवसा चेन पळविली
By Admin | Updated: March 10, 2015 01:56 IST2015-03-10T01:56:20+5:302015-03-10T01:56:20+5:30
शेगाव येथील घटना.

ज्वेलर्समधून चोरट्याने भरदिवसा चेन पळविली
शेगाव (बुलडाणा): येथील नक्षत्र ज्वेलर्स येथे ९ मार्च रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास एका चोरट्याने सोन्याची चैन घेण्याचा बहाणा करून एकाच वेळी दोन चैन गळ्यात टाकून दुकानदाराचे लक्ष चुकवून पळ काढल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, चोरट्यांचा शोध घेणे सुरू केले आहे. येथील शिवाजी चौकात निलेश शांताराम गणोरकार यांचे नक्षत्र ज्वेलर्स नावाचे सोने-चांदी विक्रीचे दुकान आहे. ९ मार्च रोजी दुपारी १ चोरटा सोने विकत घेण्यासाठी आला व दोन चैन गळ्यात घालून आरशात पाहू लागला. त्याचवेळी क्षणभरासाठी नीलेश गणोरकार यांचे लक्ष दुसरीकडे असल्याचे पाहून त्या चोरट्याने त्या दोन सोन्याच्या चैन घालून पळ काढला. गणोरकार यांच्या ही बाब तात्काळ लक्षात आली व त्यांनी चोराला पकडण्यासाठी आरडा-ओरडही केली, परंतु तो चोरटा पळुन जाण्यात यशस्वी झाला. घटनेची तक्रार पोलिसांत देण्यात आली. पोलीसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा करून तपास सुरु केला आहे. विशेष म्हणजे, चैन घेऊन पळणारा चोरटा सीसी कॅमेर्यात कैद झाला आहे. त्यामुळे या फुटेजवरून पोलीस चोरट्याचा शोध घेत असून लवकरच पकडला जाईल.