शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

जामनेर येथील पिता-पुत्रास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 1:24 AM

खामगाव :  युवकाचे अपहरण करून निर्घृण हत्या केल्या प्रकरणी जलंब पोलिसांनी जामनेर जि. जळगाव येथील पिता- पुत्रास अटक केली. टॅक्सी व्यवसाय करण्यासाठी आरोपीने ही  हत्या केल्याचे  प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. 

ठळक मुद्देआशिष राणे हत्याकांडटॅक्सी व्यवसायासाठी चोरली होती कार!

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव :  युवकाचे अपहरण करून निर्घृण हत्या केल्या प्रकरणी जलंब पोलिसांनी जामनेर जि. जळगाव येथील पिता- पुत्रास अटक केली. टॅक्सी व्यवसाय करण्यासाठी आरोपीने ही  हत्या केल्याचे  प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. दरम्यान, हत्या झालेल्या आशिषला एका जणाने दत्तक घेतले  होते. त्याला कोट्यवधी रुपयांची संपत्ती मिळणार होती, अशी  माहिती असून, त्यामुळे ही हत्या घडवून आणल्याची चर्चा आहे.  यादृष्टीने पोलीस या दिशेनेसुध्दा तपास करीत आहेत. मलकापूर  येथील आशिष भागवत राणे हा शुक्रवारी त्याचा मित्र प्रकाश  बगाडे याच्यासोबत प्रकाशची काकू लता बगाडे यांना अकोला  येथे उपचारार्थ दाखल करण्यासाठी घेऊन गेला होता.  तो कारने  (क्र.एमएच १५-डीसी ५0१३) मलकापूरकडे परतत असताना  पारखेड फाट्याजवळ विनानंबरच्या दुचाकीवरून आलेल्या  दुचाकीस्वारांनी त्यांची कार अडवून प्रकाश बगाडे याला खाली  उतरवून दिले व कारसह आशिषचे अपहरण केले होते.  आशिषची हत्या करून आरोपींनी त्याची कार पळविली होती. याप्रकरणी जलंब पोलिसांनी तपासचक्रे फिरवून  जळगाव   जिल्ह्यातील पहूर येथे कारसह दोघांना पकडले. चंद्रशेखर  सुनील शिंदे (१९) व सुनील नारायण शिंदे (५0 दोघेही रा.  नाचणखेड, ता.जामनेर) यांना ताब्यात घेण्यात आले. या पिता- पुत्राची कसून चौकशी केल्यानंतर चंद्रशेखरने कारच्या लालसे पोटी आशिषची हत्या केल्याचे कबूल केले. चंद्रशेखर याच्यावर  अनेक गुन्हे दाखल असून, तो अट्टल गुन्हेगार असल्याची माहि ती आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

टॅक्सी व्यवसायासाठी चोरली कार!गेल्या काही दिवसांपासून टॅक्सी व्यवसाय करण्याची आरोपी  चंद्रशेखरची इच्छा होती. यासाठी त्याने नवीन कार चोरण्याचे  ठरविले. यातूनच शुक्रवारी त्याने खामगाव-नांदुरा मार्गावर  आशिष राणेची कार अडवून प्रकाश बगाडेला खाली उतरवून  कार पळविली आणि काही अंतरावर आशिषची निर्घृण हत्या  केली. त्याने रस्त्यातच कारची नंबर प्लेट बदलली व कार घेऊन  नाचणखेड या त्याच्या गावाला पोहोचला. तेथून वडिलांना घेऊन  तो जळगावकडे निघाला असता पहूरजवळ त्याला पोलिसांनी  जेरबंद केले.

टॅग्स :Crimeगुन्हा