शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
2
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
3
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
5
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
6
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
7
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
8
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
9
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
10
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
11
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
12
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
13
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
14
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
15
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
16
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
17
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
18
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
19
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
20
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल

अष्टान्हिका महोत्सवानिमित्त जैन समाजाची शोभायात्रा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2018 11:57 AM

आदिनाथ मंदिराच्या शतकोत्तर रजत जयंतीनिमित्त आयोजित ऐतिहासिक अष्टान्किा महोत्सवात मंगळवारी सकाळी भव्य शोभायात्रा काढण्यात आली.

खामगाव: येथील आदिनाथ मंदिराच्या शतकोत्तर रजत जयंतीनिमित्त आयोजित ऐतिहासिक अष्टान्किा महोत्सवात मंगळवारी सकाळी भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यामध्ये मुमुक्षुबेन(दिक्षार्थी)  रोशनीदीदी यांची हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली. या शोभायात्रेचे शहरात ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. खामगाव येथील आदिनाथ मंदिराच्या शतकोत्तर रजतजयंती निमित्त प.पू. साध्वीजी प्रितीधर्माश्रीजी यांच्या मार्गदर्शनात यावर्षी २१ ते २८ जानेवारी या कालावधीत अष्टान्हिका महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवासाठी  आचार्य विनयसागर, आचार्य गुणचंद्र सागर सुरीश्वरजी, रविपद्मसागर, जैनेशसागर, साध्वी समयगुणाश्री खामगाव नगरीत उपस्थित असून, मंगळवारी सकाळी ८.३० वाजता दिक्षार्थी रोशनीदीदी यांच्या दिक्षासोहळ्यानिमित्त शहराच्या विविध मार्गावरून भव्य शोभायात्रा काढण्यात आली.  या शोभायात्रेचे जैन समाज बांधवांसोबतच विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वागत केले. या शोभायात्रेत श्री शतकोत्तर रजत महोत्सव समिती तथा सकल जैन समाजाचे नरेंद्रभाई संकलेचा, अनिलभाई विकमशी, राजेशभाई शहा, मनोज शहा, पश्वीन नागडा, हिरेनभाई लोडाया, संदीप शहा यांच्यासह जैन समाज बांधव मोठ्यासंख्येने सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे खामगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार अ‍ॅड. आकाश फुंडकर, नगर परिषद अध्यक्ष अनिताताई डवरे, उपाध्यक्ष संजय पुरवार, पाणी पुरवठा सभापती ओम शर्मा, नगरसेवक सतीशआप्पा दुडे आदींनी शोभायात्रेचे स्वागत केले.