शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून भाजपाशी जुळवूण घेणे अवघड झाले होते, आनंदराव अडसुळांचा गौप्यस्फोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 19:06 IST

सत्तेत सोबत असतानाही भाजपची स्वार्थी वृत्ती दिसून आली होती. त्यामुळे राज्यात सत्ता स्थापन करताना भाजपपासून दूर गेल्याचे ते म्हणाले.

बुलडाणा: अलिकडील काळात राजकारणाची व्याख्या बदलत असून तत्व पाळल्या जात नसल्याची खंत शिवसेनेचे नेते तथा माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री आनंदराव अडसूळ यांनी बुलडाणा येथे व्यक्त केली. बुलडाणा येथे औपचारिक भेटीवर ते आले असता प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही बाब अधोरेखीत केली. दरम्यान, भाजपशी  त्यावेळी जुळवून घेणे अत्यंत अवघड झाले होते. सत्तेत सोबत असतानाही भाजपी स्वार्थी वृत्ती दिसून आली होती. त्यामुळे राज्यात सत्ता स्थापन करताना भाजपपासून दूर गेल्याचे ते म्हणाले.सातत्याने भाजपकडून दिला जाणारा दुजाभाव पाहता अखरे शिवसेनेला वेगळी भूमिका घ्यावी लागली होती, असेही त्यांनी स्पष्ट केले. सीएएला शिवसेनेचा विरोध नाही पण एनआरसीमध्ये नंतर टाकण्यात आलेल्या काही अटी अडचणीच्या आहेत. त्याबाबात भूमिका शिवसेनेने घेतली असल्याचे ते म्हणाले.अमरावतीच्या राजकारणात सक्रीयच असून तेथे आपला फोकस कायम आहे. निश्चलीकरणामुळे देशात अनेक समस्या निर्माण झाल्या. सामान्य माणसापासून ते उद्योगपतीपर्यंत सर्वांनाच अडचणी आल्या व अर्थचक्राला फटका बसला, अद्याप त्यातून आपण वर आलो नाही, असे सांगत बेरोजगारी वाढली आहे. उद्योग बंद पडले आहेत. अर्थव्यवस्थेत सुधारणा होत असल्याचे सांगितले जात असले तरी जिडीपी साडेचार ते पाच टक्क्यावर जात नाही, ही वस्तुस्थिती असल्याचे ते म्हणाले. शिवसेनेते सर्व आलबेलबुलडाणा जिल्ह्यातील शिवसेनेमध्ये अंतर्गत वाद असल्याबाबत त्यांना छेडले असता प्रथमत: या मुद्द्यावर बोलण्याचे त्यांनी टाळले. मात्र जिल्ह्यात शिवसेनेची पूर्वीचीच ताकद कायम आहे. दोन आमदार, एक खासदार येथे आहेत. त्यामुळे पक्षांतर्गत असे वाद नाही, असेच त्यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे बुलडाण्यात आपण प्रदीर्घ काळ खासदार होता. बुलडाण्यात मिळालेले प्रेम आणि येथील सांस्कृतिक वारसा हा माणुसकीचा आहे. आज अन्यत्र परिवर्तन होत असले तरी बुलडाणेकरांनी आपल्यातील माणुसकी टिकवून ठेवली असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Anandrao Adsulआनंदराव अडसूळBJPभाजपाShiv Senaशिवसेना