गळफास घेऊन इसमाची आत्महत्या
By Admin | Updated: December 18, 2015 02:25 IST2015-12-18T02:25:22+5:302015-12-18T02:25:22+5:30
३५ वर्षीय अनोळखी इसमाने आत्महत्या केल्याची घटना १५ डिसेंबरच्या रात्रीदरम्यान घडली.

गळफास घेऊन इसमाची आत्महत्या
सुलतानपूर (जि. बुलडाणा): येथील अनिरुद्ध जोशी यांच्या मेहकर रोडवरील शेतात बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन एका ३५ वर्षीय अनोळखी इसमाने आत्महत्या केल्याची घटना १५ डिसेंबरच्या रात्रीदरम्यान घडली. एका ३५ वर्षीय अनोळखी इसमाने बाभळीच्या झाडाला अंगातील फुलपॅन्टने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती कळताच सपोनी गव्हाणे व पोकॉ. सानप यांनी घटनास्थळी पंचनामा केला असून, इसमाची ओळख पटली नव्हती.