घरावर हल्ला करून इसमास लोखंडी पाइपने मारहाण

By Admin | Updated: April 2, 2017 01:49 IST2017-04-02T01:49:06+5:302017-04-02T01:49:06+5:30

खामगाव तालुक्यातील चितोडा येथील घटना.

Ismaas attacked by house with iron pipe | घरावर हल्ला करून इसमास लोखंडी पाइपने मारहाण

घरावर हल्ला करून इसमास लोखंडी पाइपने मारहाण

खामगाव, दि. १- पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिल्याच्या कारणावरून वाद होऊन सात जणांनी एका घरावर हल्ला करून इसमास लोखंडी पाइपने मारहाण केल्याची घटना तालुक्यातील चितोडा येथे घडली. याबाबत सदानंद तिडके (वय ५0) रा.चितोडा यांनी ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार दिली, की त्यांनी पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिल्याने चिडून जात गावातीलच संघपाल हिवराळे, संदीप हिवराळे, बाबूराव हिवराळे, नितेश हिवराळे, रमेश हिवराळे, वैभव हिवराळे, राहुल हिवराळे यांनी ३0 मार्चच्या रात्री तिडके यांच्या घरावर हल्ला चढवून दगडफेक केली. तसेच तिडके यांना लोखंडी पाइपने मारहाण करून जखमी केले. या तक्रारीवरून पोलिसांनी उपरोक्त सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Ismaas attacked by house with iron pipe