सिंचन घोटाळा: जिगाव प्रकल्पाची चौकशी सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 03:06 PM2019-11-27T15:06:48+5:302019-11-27T15:07:01+5:30

चार प्रकल्पांमध्ये झालेल्या अनियमितता व गैरप्रकारांची चौकशी मात्र लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू असल्याचे सुत्रांनी नाव न सांगण्याच्या अटीवर स्पष्ट केले आहे.

Irrigation scam: Investigation of Jiggaon project underway | सिंचन घोटाळा: जिगाव प्रकल्पाची चौकशी सुरूच

सिंचन घोटाळा: जिगाव प्रकल्पाची चौकशी सुरूच

Next

- नीलेश जोशी 
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : सिंचन घोटाळ््यातंर्गत बुलडाणा जिल्ह्यातील पाच प्रकल्पांच्या कामासंदर्भात सुरू असलेल्या उघड चौकशीपैकी एकमेव नांदुरा तालुक्यातील लोणवडी प्रकल्पाची चौकशी नस्तीबंद करण्यात आली असून अन्य चार प्रकल्पांमध्ये झालेल्या अनियमितता व गैरप्रकारांची चौकशी मात्र लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू असल्याचे सुत्रांनी नाव न सांगण्याच्या अटीवर स्पष्ट केले आहे. प्रामुख्याने जिगाव, खडकपूर्णा, पेनटाकळी आणि लोणार तालुक्यातील हिरडव या लघु प्रकल्पाचा यात समावेश आहे.
दुसरीकडे जिगाव प्रकल्पाशी संबधीत एका प्रकरणात चौकशी पूर्ण करून दोषारोपत्र दाखल करण्यासाठी जलसंपदा विभागाकडे गेल्यावर्षीच परवानगी मागण्यात आलेली दौषारोपपत्रातील नावे उलटी वाढविण्यात आली असून ती सख्या आठ वरून दहावर गेली आहे. दरम्यान, पेनटाकळी, खडकपूर्णा, हिरडव (लोणार) आणि नांदुरा तालुक्यातील लोणवडी या चार प्रकल्पांच्या कामाचीही चौकशी गेल्याच वेळी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गेल्यावर्षीच सुरू केली होती. त्यातील नऊ कोटी २९ लाख ६८१ कोटी रुपयांच्या प्रकल्पाच्या कामासंदर्भातील उघड चौकशी ही गेल्या तीन ते चार महिन्यापूर्वीच बंद करण्यात आली आहे. या लघु प्रकल्पाशी संबधीत दोन निविदांवर प्रामुख्याने उघड चौकशी करण्यात आली होती. त्यात काही न आढळ््यामुळे ती बंद करण्यात आली असल्याचे सुत्रांनी स्पष्ट केले.
जिगाव प्रकल्पासंदर्भातील चौकशी ही २०१४ पासून सुरू असून एका निविदा प्रकरणात कंत्राटदाराचे अनुभव प्रमाणपत्र बनावट असल्याचे जवळपास निश्चित झालेले असून त्यासंदर्भाने गुन्ह्याचा तपास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केला असून प्रकरणात कथितस्तरावरील आरोपींची संख्या ही आठ वरून दहावर पोहोचली आहे. प्रकल्पाची वाढती किंमत, पुनर्वसन, जमीन अधिग्रहणाला प्राधान्य न देणे यासह तत्सम प्रकरणात ही चौकशी करून दोषारोपत्र दाखल करण्याची परवानगी मागण्यात आलेली आहे. जिगाव प्रकल्पांतर्गतच ५ नोव्हेंबर २०१७ रोजी प्रकल्पाचे काम मिळवून देण्यासाठी कंत्राटदारास बनावट प्रमाणपत्र मिळवून दिल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खामगाव पोलीस ठाण्यात सात अभियंत्यांविरोधात गुन्हा दाखल केला होता. काम मिळवून देण्यासाठी अभियंत्यांनीच बनावट प्रमाणपत्र दिल्याचा आरोप आहे. ५ वर्षांच्या आर्थिक उलाढालीची सरासरी न घेताच बाजोरिया कन्स्ट्रक्शन कंपनीला प्रमाणपत्र दिले गेले होते.


‘लोणवडी’च्या दोन निविदांचीही चौकशी बंद
अमरावती विभागातील २५ प्रकल्पांची २३ जानेवारी २०१८ पासून चौकशी सुरू होती. त्यासाठी विशेष तपास (एसआयटी) पथकही गठीत करण्यात आले होते. बुलडाणा जिल्ह्यातील पेनटाकळी, खडकपूर्णा, हिरडव (लोणार) आणि लोणवडी प्रकल्पांच्या कामाची माहिती घेण्यात येत आहे. निविदा व इतर गैरप्रकाराबाबत कागदपत्रे गोळा करण्याचे काम या पथकाकडून करण्यात येत आहे. दरम्यान, नांदुरा तालुक्यातील लोणवडी या लघु प्रकल्पाची चौकशी पूर्ण झाली असून दोन निविदांची प्रामुख्याने तपासणी करण्यात आली. त्यात काही गैरप्रकार तथा अनियमितता न आढळल्याने लोणवडी प्रकल्पाची चौकशी बंद करण्यात आली असलाचे सुत्रांनी सांगितले.

४१६ निविदांची चौकशी
खडकपूर्णा प्रकल्पाचीही सध्या चौकशी सुरू असून एकूण ४१७ निविदा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून तपासण्यात येत होत्या. त्यातील एका निवेदेची चौकशी पूर्ण झाली होती. त्यात काही न आढळल्यामुळे केवळ या एका निविदेपूरतेची चौकशी बंद करण्यात आली आहे. अन्य ४१६ निविदांच्या चौकशी सुरू आहे. मात्र प्रकल्प १५ वर्षापेक्षा अधिक जुना असल्याने त्यासंदर्भातील कागदपत्रे मिळण्यात विलंब होत आहे. त्यामुळे त्यांची तपासणी व व्हेरीफिकेशन करण्यास विलंब लागत असल्याचे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या वरिष्ठ सुत्रांनी नाव न सांगण्याच्या अटीवर स्पष्ट केले आहे. अशीच स्थिती पेनटाकळी प्रकल्पाचीही आहे. निविदांचीही माहिती मिळण्यात विलंब होत आहे.

Web Title: Irrigation scam: Investigation of Jiggaon project underway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.