शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

वाण प्रकल्पांतर्गत सिंचनाचे क्षेत्र कमी होणार! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 12:05 AM

वरवट बकाल: पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देताना शासनाने  वाण प्रकल्पांतर्गत सिंचनाचे क्षेत्र कमी केले आहे. या  धोरणानुसार १९६ हेक्टर सिंचन क्षेत्र कमी करण्यात आले. तर  अकोला जिल्हय़ातील १५९ गावांना या प्रकल्पाचे पाणी जाणार आहे. 

ठळक मुद्दे१९६ हेक्टर सिंचन क्षेत्र कमी करण्यात आले आहेया प्रकल्पाचे पाणी अकोला जिल्हय़ातील १५९ गावांना जाणार 

लोकमत न्यूज नेटवर्कवरवट बकाल: पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देताना शासनाने  वाण प्रकल्पांतर्गत सिंचनाचे क्षेत्र कमी केले आहे. या  धोरणानुसार १९६ हेक्टर सिंचन क्षेत्र कमी करण्यात आले. तर  अकोला जिल्हय़ातील १५९ गावांना या प्रकल्पाचे पाणी जाणार  असून, बुलडाणा जिल्हय़ातील १४0 गाव पाणीपुरवठा योजनें तर्गत  कामे अपूर्ण असल्याने या गावांची पाण्याची प्रतीक्षा कायम  आहे. संग्रामपूर तालुक्यातील वान नदीवर वान प्रकल्प झाल्याने  काठावरील गावांच्या जलपातळीत प्रचंड प्रमाणात घट झाल्याने  सिंचन क्षेत्र घटले व पाणी टंचाईचा सामना करावा लागत  आहे.हनुमान सागर या नावाने ओळखल्या जात असलेल्या वाण  प्रकल्पात बर्‍यापैकी जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे अकोट व  तेल्हारा या दोन्ही तालुक्यातील जनतेला पिण्यासाठी पाणीपुरवठा  केला जावा, अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधीने शासन  दरबारी करून सतत पाठपुरावा केल्याने असल्याने अखेर २६  ऑक्टोबर रोजी संध्याकाळी अकोट व तेल्हारा या दोन्ही तालु क्यातील १५९ गावांना पाणीपुरवठा करण्याबाबत शासन निर्णय  धडकला. त्यामुळे दोन्ही तालुक्यातील जनतेला वाण धरणातून  पाणीपुरवठा केला जाणार आहे. परिणामी या तालुक्यातील १९६ हेक्टर जमीन रब्बी हंगामातील  सिंचनापासून वंचित राहणार आहे. हा पाणीपुरवठा हनुमान सागर  जलाशयातून ३.७५३ दलघमी केला जाणार असून,कालवा क्र .  २६0 द्वारे हे पाणी निगर्मित केले जाणार आहे. तर बुलडाणा  जिल्हय़ातील जळगाव जा, संग्रामपूर तालुक्यातील जनता  क्षारयुक्त पाणी पित असल्याने किडनी आजारात मोठय़ा प्रमाणात  वाढ होत आहे. १४0 गाव योजनेची कामे बाकी असल्याने  अनेक गावांना हक्काच्या वाण धरणातील पाणी अद्याप मिळत  नसल्याचे दिसून येते. बुलडाणा जिल्हय़ातील वान धरणाचे ह क्काचे पाणी अकोला जिल्हय़ात पळविले जात असताना  जिल्हय़ातील लोकप्रतिनिधी बघ्याची भूमिका घेत असल्याने ह क्काच्या वाण धरणातील शुद्ध पाण्यापासून वंचित असलेल्या  जनतेत तीव्र असंतोष निर्माण झाला असून, नाराजीचा सूर निघत  आहे. संग्रामपूर तालुक्यातील १४0 गाव पाणीपुरवठा योजना  मंजूर असून, टाकीचे बांधकाम झाले. पाइपलाइनचे कामही  बर्‍याच प्रमाणात झाले; पण वाण धरणातून पाणी संबंधित गावात  केव्हा पोहचणार याची प्रतीक्षा नागरिकांना लागून आहे.

टॅग्स :Waterपाणी