इंटरनेट सेवा विस्कळीत

By Admin | Updated: September 19, 2014 23:03 IST2014-09-19T23:03:11+5:302014-09-19T23:03:11+5:30

मेहकर तालुक्यातील इंटरनेट सेवा विस्कळीत, बँकांचे कामकाज प्रभावित.

Internet service disrupted | इंटरनेट सेवा विस्कळीत

इंटरनेट सेवा विस्कळीत

मेहकर : स्थानिक भारतीय स्टेट बँकेच्या दोन्ही शाखेतील इंटरनेट सेवा वारंवार विस्कळीत होत आहे. त्यामुळे ग्राहकांना कित्येक तास बँकेत ताटकळत बसावे लागत असून, बँकेच्या गलथान कारभाराचा येथे येणार्‍या प्रत्येक ग्राहकाला फटका बसत आहे.
अनेक संस्था, बँकमध्ये होत असलेले भ्रष्टाचार, घोटाळे आदींमुळे पतसंस्थेवरील लोकांचा विश्‍वास दिवसें-दिवस कमी होत असतांना ग्राहकांचा कल भारतिय स्टेट बँक , बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेत होत आहे. शासकीय कर्मचार्‍यांचे वेतन, सर्वसामान्यांचे व्यवहार यासह शालेय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीही स्टेट बँकेतून विद्यार्थ्यांना दिली जाते. तसेच शासनाच्यावतीने निराधार व वृद्धांना मिळणारा आर्थिक लाभही भारतिय स्टेट बँकेतूनच दिला जातो. तसेच शेतकर्‍यांचे पीक कर्ज काढणे, पीक विमा भरणे आदी व्यवहारही भारतीय स्टेट बँकेतूनच करण्यात येतात. भारतीय स्टेट बँकेची एटीएम मशीनही तांत्रीक कारणामुळे वारंवार बंद पडत आहे. यामुळे ग्राहकांना पैसे काढण्यासाठी नेहमी अडथळा निर्माण होत आहे. बँकेतील इंटरनेट सेवा कायमस्वरुपी सुरळीत करुन येथे काऊंटर वाढविण्यात यावे अशी मागणी ग्राहकांमधुन होत आहे.

Web Title: Internet service disrupted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.