शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
3
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
4
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
5
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
6
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
7
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
8
आयोग नव्हे, मतदारच राजा !
9
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
10
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
11
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
12
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
13
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
14
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
15
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
16
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
17
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
18
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
19
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
20
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई

एसटीच्या अघोषीत संपाची तीव्रता वाढली; दोन दिवसात ७८५ बसफेऱ्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 18:25 IST

बुलडाणा : पगार वाढीच्या मुद्द्यावर राज्यात एसटी कर्मचाºयांच्या सुरू असलेल्या संपाची तीव्रता दुसºया दिवशी वाढली आहे.

ठळक मुद्देबुलडाणा जिल्ह्यातील सर्वच आगारांचा या संपात सहभाग नसला तरी प्रशासकीय, यांत्रिक, चालक व वाहक अशा एकूण ५९८ कर्मचारी संपात उतरले आहेत.संपाच्या पहिल्या दिवशी ८ जून रोजी १४८ प्रशासकीय, यांत्रिक, चालक व वाहकांनी संपात सहभाग घेतला होता. ९ जून रोजी जिल्ह्यातील आगारातून ७७६ पैकी ४७७ बसफेºया रद्द करण्यात आल्या असून २९९ बसफेºया सोडण्यात आल्या.

- ब्रम्हानंद जाधवबुलडाणा : पगार वाढीच्या मुद्द्यावर राज्यात एसटी कर्मचाºयांच्या सुरू असलेल्या संपाची तीव्रता दुसºया दिवशी वाढली आहे. त्यामुळे प्रवाशांची डोकेदुखी वाढली असून त्यांना खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. जिल्ह्याचा विचार करता ६१ टक्के बसगाड्यांच्या चाकांची गती रोडावली आहे. संपात सहभागी होणाºया कर्मचाºयांचा आकडा जिल्ह्यात पाचशेपार गेला आहे. पगारवाढीसह विविध मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाºयांनी  ८ जूनपासून संप पुकारला आहे. काही कामगार संघटनांनी अघोषित कामकाज बंद आंदोलन पुकारले  आहे. पुर्वकल्पना न देता हा संप पुकारल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. अचानक एसटी महामंडळाचे कर्मचारी संपावर गेल्यामुळे अनेक बसफेºया रद्द कराव्या लागल्या आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील सर्वच आगारांचा या संपात सहभाग नसला तरी प्रशासकीय, यांत्रिक, चालक व वाहक अशा एकूण ५९८ कर्मचारी संपात उतरले आहेत. एस.टी. कर्मचाºयांच्या अघोषित संपामुळे जिल्ह्यात दोन दिवसात ७८५ बसफेºया रद्द झाल्या आहेत. संपाच्या पहिल्या दिवशी ८ जून रोजी १४८ प्रशासकीय, यांत्रिक, चालक व वाहकांनी संपात सहभाग घेतला होता. त्यामुळे एकूण १ हजार २९१ पैकी ९८५ बसफेºया सोडण्यात आल्या. तर ३०८ बसफेºया रद्द झाल्या होत्या. तर संपाच्या दुसºया दिवशी संपात उतरणाºया कर्मचाºयांची संख्या ५९८ वर पोहचली आहे. ९ जून रोजी जिल्ह्यातील आगारातून ७७६ पैकी ४७७ बसफेºया रद्द करण्यात आल्या असून २९९ बसफेºया सोडण्यात आल्या. त्यामुळे दुसºया दिवशी संपाची तीव्रता वाढली काही बसस्थानकावरून एकही बस सोडण्यात आली नाही. त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले. बसफेºया न गेल्यामुळे बाहेरगावावरून आलेले काही चालक व वाहकही अडकून पडल्याचे दिसून आले. एसटी कार्मचाºयांनी अचानक पुकारलेल्या या संपामुळे एसटी महामंडळाला मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसला आहे. 

४९० चालक-वाहक उतरले संपातएसटी कर्मचाºयांच्या अघोषीत संपाच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यातून ३६ चालक व ४१ वाहक सहभागी झाले होते. मात्र दुसºया दिवशी या संपाचे लोन जिल्हाभर पसरल्याने कर्मचाºयांची संख्याही वाढली आहे. ९ जून रोजी ४९० चालक-वाहक या संपात उतरले  आहेत. त्यामध्ये  २५७ चालक व २३३ वाहकांचा समावेश आहे. 

असा आहे कर्मचाºयांचा सहभागजिल्ह्यात एसटी महामंडळाचे एकूण २ हजार ५७८ कर्मचारी आहेत. त्यामध्ये ९ जून रोजी १ हजार ८३० कर्मचारी हजर होते. तर १५० कर्मचारी अधिकृत रजेवर आणि ५९८ कर्मचारी संपात सहभागी झाले होते. संपात सहभागी कर्मचाºयांमध्ये प्रशासकीय ५९, यांत्रिक ४९, चालक २५७ व वाहक २३३ सहभागी आहेत. 

सुटलेल्या बसही निश्चित स्थळी पोहचेनात!जिल्ह्यात २९९ बसफेºया सोडण्यात आल्या. मात्र यातील लांबपल्याच्या बहुतांश बसफेºया निश्चित स्थळापर्यंत पोहचतील याची शाश्वती चालक व वाहक देवू शकत नाहीत. बुलडाणा येथून अमरावती जाणाºया बसमध्ये ज्या प्रवाशाला अमरावती जायचे त्यालाही अकोलापर्यंतचेच टिकीट देण्यात येत असल्याचा प्रकार दोन दिवसांपासून सुरू आहे. पुन्हा अकोल्याच्या समोर बस गेली तर नविन टिकीट काढण्याचा सल्ला चालकांकडून दिल्या जात आहे.  खाजगी बस मालामालएसटी कर्मचाºयांनी अचानक पुकारलेल्या या संपामुळे लांबपल्ल्याच्या अनेक बस रद्द झाल्या आहेत. बुलडाणा जिल्ह्यातून नागपूर, औरंगाबाद, पुणे जाणाºया बस शेवटच्या स्थळापर्यंत पोहचत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे खाजगी बसचे प्रवाशी वाढले असून खाजगी बसची चांदी होत आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाstate transportराज्य परीवहन महामंडळ