शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

नव्या फळबागांना विमा योजना लागू; जुन्याची मात्र प्रतीक्षाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 14:21 IST

बुलडाणा: शासनाने नवीन फळबागांसाठी विमा योजना लागू केली आहे. मात्र प्रत्यक्षात पूर्वीच्या फळबागांचे नुकसान होऊनही अद्याप त्याची मदत देण्यात आली नाही

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: शासनाने नवीन फळबागांसाठी विमा योजना लागू केली आहे. मात्र प्रत्यक्षात पूर्वीच्या फळबागांचे नुकसान होऊनही अद्याप त्याची मदत देण्यात आली नाही. गतवर्षी केळी फळबागेसह इतर फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते; मात्र त्याच्या विम्यासाठी शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे.प्रधानमंत्री कृषि पीक विमा योजनेतंर्गत पुर्नरचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना २०१९-२० करीता जाहीर करण्यात आली आहे. या योजनेतील विम्याचा लाभ मृग बहारामध्ये संत्रा, मोसंबी, डाळींब, पेरू, लिंबू व चिकु या सहा फळपिकांसाठी मिळणार आहे. बँकेकडून अधिसूचित फळ पिकांसाठी पीक कर्ज मर्यादा मंजूर असलेल्या शेतकऱ्यांना तसेच बिगर कर्जदार शेतकºयांनी विमा प्रस्ताव बँकांना सादर करण्याची मुदत फळपिकनिहाय देण्यात आलेली आहे. बिगर कर्जदार शेतकºयांनी विमा प्रस्ताव बँकांना सादर करण्याची अंतिम मुदत संत्रा, पेरू, लिंबू, या फळ पिकांकरीता १४ जून, चिकु व मोसंबी फळपिकासाठी १ जुलै तर डाळींब पिकाकरीता १५ जुलै आहे. फळपीक निहाय निर्धारीत केलेले हवामान धोके लागू झाल्यावर नुकसान भरपाई देण्यात येते. मात्र मागीलवर्षी दुष्काळाचा फटका बसलेल्या व नुकसान झालेल्या फळ पिकांचा विमा अद्यापही शेतकºयांना मिळाला नाही. त्यामुळे नवीन फबागेचा नवीन विमा काढावा की नाही, असा प्रश्न शेतकºयांसमोर निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)बोरखेड, पलढग येथे झाले होते नुकसानबुलडाणा तालुक्यातील बोरखेड व पलढग येथे काही शेतकºयांनी खरीप हंगामामध्ये केळी पिकाची लागवड केली होती. परंतू हिवाळ्यात डिसेंबर २०१८ व जानेवारी २०१९ मध्ये पडलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे केळीचे पिक करपून नष्ट झाले होते. त्याचबरोबर जिल्ह्यातील इतर फळबागांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. परंतू अद्यापही पिक विम्याचा लाभ मिळाला नाही.विम्याचा लाभ देण्याची मागणी४नुकसान झालेल्या फळबागांचा पिक विमा मंजूर करून देण्यात यावा, अन्यथा बँकेचे पिक कर्ज भरता येणार नाही व नवीन पिक कर्ज बँक देणार नाही, पुढील हंगामामध्ये कर्ज न मिळाल्यामळे शेतीची पेरणी करता येणार नाही, असे अनेक प्रश्न शेतकरी विठ्ठल गवळी, सुधाकर गवळी, दयाराम पायगव्हाण, अशोक खांडेभराड, आशा खांडेभराड यांनी जिल्हाधिकाºयांकडे उपस्थित केले आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrop Insuranceपीक विमाagricultureशेतीFarmerशेतकरी