व्हॉट्स अँपमधून प्रेरणा: ग्रामस्थांनी काढले अतिक्रमण!

By Admin | Updated: December 7, 2015 02:24 IST2015-12-07T02:24:29+5:302015-12-07T02:24:29+5:30

मातोळा तालुक्यातील ग्रामस्थांनी स्वच्छतेची कास धरली.

Inspiration from the Whites Ape: the encroachments taken by the villagers! | व्हॉट्स अँपमधून प्रेरणा: ग्रामस्थांनी काढले अतिक्रमण!

व्हॉट्स अँपमधून प्रेरणा: ग्रामस्थांनी काढले अतिक्रमण!

मोताळा (जि. बुलडाणा): येथील फ्रें ड्स माय लाइफ ग्रुप सदस्यांची प्रेरणा, सहकार्य व योगदानाने परडा ये थील सरंपच छाया विश्‍वास पाटीलसह ग्रामस्थांनी स्वच्छतेची कास धरली असून, रविवारी गावकर्‍यांनी अ ितक्रमण काढण्यासाठी पुढाकार घेत स्वच्छता अभियानाचा दुसर्‍या टप्प्याला सुरुवात केली.
परडा ग्रामस्थांनी आपल्या गावाला आदर्श बनवायचेच हे ध्येय समोर ठेवले असून, दुसर्‍या टप्प्यात गावातील अतिक्रमण काढण्यात आले आहे. यासाठी फ्रेंड्स माय लाइफ ग्रुपचे सदस्य महेश टावरी यांनी स्वत:ची जेसीबी मशीन देऊन मोठे योगदान दिले आहे. यामुळे परडा ग्रामस्थांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. दुसर्‍या टप्प्यात गावातील संपूर्ण नळाला तोट्या ग्रुप सदस्य प्रा. गणेश झंवर देणार आहेत. तर बोराखेडीचे सरपंच सुरेश गर्दे शोष खड्डय़ासाठी विटांचे तुकडे देणार आहेत. या शिवाय इतरही ग्रुप सदस्य आपापल्या परीने योगदान करून गावला आदर्श बनविण्यासाठी पुढाकार घेणार आहेत. गेल्या २२ नोव्हेंबर रोजी येथील फ्रेंड्स माय लाइफ व्हॉट्स ग्रु पच्या सदस्यांमध्ये परडा गावाला आदर्श बनविण्याची कल्पना सुचली होती. या कल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी सरपंच छया विश्‍वास पाटीलसह परडा ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. लगेच २२ नोव्हेंबर रोजी कामाला सुरुवात करण्यात आली.

Web Title: Inspiration from the Whites Ape: the encroachments taken by the villagers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.