महिलांच्या पुढाकाराने ढालसावंगी झाले दारुमुक्त
By Admin | Updated: May 5, 2017 13:52 IST2017-05-05T13:52:09+5:302017-05-05T13:52:09+5:30
महिलांच्या पुढाकाराने गाव दारूमुक्त झाले आहे.

महिलांच्या पुढाकाराने ढालसावंगी झाले दारुमुक्त
ढालसावंगी : बुलडाणा तालुक्यातील ढालसावंगी या गावात परिसरात, शेत
शिवारात कित्येक वर्षापासून अवैध गावठी दारु गाळून त्याची विक्री होत
होती. मात्र, महिलांच्या पुढाकाराने गाव दारूमुक्त झाले आहे.
गावातील दारूविक्रीबाबत महिला मंडळाच्या अध्यक्ष मुक्ताबाई नागरे, सरपंच
विमलताई संजय नरवाडे यांचे सह २० ते २५ महिलांनी पोलिस प्रशासनाला निवेदन
दिले होते. यानंतर धाड येथील पोलिस पथकाचे पि.एस.आय.गजानन मुंढे,
पो.काँ.ऋषिकेश पालवे यांनी छापे टाकून दारु गाळणाऱ्यावर आणि विक्रेत्यावर
कारवाई केली. महिला मंडळांनी वेळोवेळी माहिती देवून पोलिसांनी महिला
मंडळाला सहकार्य केले परिणामी गाव दारु मुक्त झाल्याचे महिलामध्ये समाधान
व्यक्त होत आहे.