निकृष्ट दर्जाचे मोबाईल अंगणवाडी सेविकांनी केले कार्यालयात जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:39 IST2021-08-24T04:39:01+5:302021-08-24T04:39:01+5:30

अंगणवाडी सेविकांना त्यांच्या अंगणवाडीचे कामकाज ऑनलाईन प्रणालीमध्ये जोडले जावे यासाठी शासनाने अँड्रॉइड मोबाईलचा पुरवठा केला होता. परंतु संबंधित मोबाईलमध्ये ...

Inferior mobiles made by Anganwadi workers are deposited in the office | निकृष्ट दर्जाचे मोबाईल अंगणवाडी सेविकांनी केले कार्यालयात जमा

निकृष्ट दर्जाचे मोबाईल अंगणवाडी सेविकांनी केले कार्यालयात जमा

अंगणवाडी सेविकांना त्यांच्या अंगणवाडीचे कामकाज ऑनलाईन प्रणालीमध्ये जोडले जावे यासाठी शासनाने अँड्रॉइड मोबाईलचा पुरवठा केला होता. परंतु संबंधित मोबाईलमध्ये अत्यंत कमी डाटा संकलन असल्यामुळे वारंवार बंद पडत होते. केंद्र शासनाने पोषण ट्रॅकर ॲप्स अंतर्गत अंगणवाडीचे दैनंदिन कामकाज करणे सक्तीचे केले होते. मात्र, कमी रॅम असल्यामुळे हे ॲप्स डाऊनलोड होत नाही. त्यासाठी अंगणवाडी सेविकांना आपल्या खासगी वैयक्तिक मोबाईलचा वापर करावा लागत होता. ट्रॅकर ॲप्समध्ये लाभार्थी यादी झिरो ते सहा वर्षे बालके, गरोदर माता, स्तनदा माता यांची नोंद दैनंदिन हजेरी भरणे, सर्व लाभार्थी घरपोच आहार नोंदणी आणि वाटप संपूर्ण लाभार्थ्यांची वजन-उंची दरमहा घेऊन ॲपवर नोंदवणे आदी कामे संबंधित मोबाईलमधून करावी लागत होती. परंतु अत्यंत निकृष्ट आणि कमी रॅम असलेल्या मोबाईलमुळे अंगणवाडी सेविकांना कामकाज करण्यासाठी वारंवार बाधा येत होती. त्यानुसार तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी ते मोबाईल तालुका कार्यालयात जमा केले. यामध्ये नंदा देशमुख, लक्ष्मी खरात, आशा जाधव, सुनीता काळे, गोदावरी वाघ, उषा साप्ते आदींसह तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविकांची उपस्थिती होती.

Web Title: Inferior mobiles made by Anganwadi workers are deposited in the office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.