शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
4
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
5
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
6
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
7
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
8
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
9
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
10
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
11
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
12
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
13
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
14
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
15
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
16
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
17
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
18
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
19
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
20
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
Daily Top 2Weekly Top 5

बुलढाणा जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारंसघांत स्वतंत्र उमेदवार; रविकांत तुपकर यांची घोषणा

By निलेश जोशी | Updated: July 7, 2024 00:40 IST

तुपकरांनी यावेळी सर्वांची मते जाणून घेत बुलढाणा, चिखली, सिंदखेड राजा, मेहकर, खामगाव, जळगाव जामोद आदी सहा विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभे करणार असल्याचे स्पष्ट केले.

बुलढाणा: लोकसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून घेतलेली मते पाहता शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी बुलढाणा लोकसभा मतदारसंघातंर्गत येत असलेल्या सहाही विधानसभा मतदारसंघात स्वतंत्र उमेदवार उभे करण्याचा निर्णय ६ जुलै रोजी घेतला आहे. चिखली रोडवरील एका सभागृहात झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्यांनी ही घोषणा केली.

लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांची ताकद दिसून आल्याचे सांगत कार्यकर्त्यांनी, रविकांत तुपकर यांनीही विधानसभा निवडणूक लढवावी, असा आग्रह धरला. तुपकरांनीही यावेळी सर्वांची मते जाणून घेत बुलढाणा, चिखली, सिंदखेड राजा, मेहकर, खामगाव, जळगाव जामोद आदी सहा विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभे करणार असल्याचे स्पष्ट केले. या सर्व मतदारसंघातील उमेदवार हे शेतकऱ्यांचे रहातील असे तुपकर म्हणाले. दरम्यान, ते स्वत: विधानसभा निवडणूक लढविणार आहेत का, याबाबतची भूमिका मात्र, त्यांनी स्पष्ट केली नाही. याशिवाय राज्यपातळीवरील निर्णय पुण्यातील बैठकीत घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

--राज्यव्यापी आंदोलन उभारणार--सोयाबीन-कापूस, पिकविमा, नुकसान भरपाई, वन्य प्राण्यांचा होणारा त्रास पहाता या प्रश्नी राज्यव्यापी आंदोलन उभे करणार असल्याचे तुपकर म्हणाले. गेल्या काही वर्षांपासून सोयाबीन-कापूस, पिकविमा व नुकसान भरपाईसाठी ते लढा ते आहे. त्यात काही प्रमाणात यश आले असून, आता राज्यव्यापी आंदोलन उभारण्याचे संकेत त्यांनी दिली.

टॅग्स :Ravikant Tupkarरविकांत तुपकरElectionनिवडणूक 2024vidhan sabhaविधानसभा