आदिवासी कोळी बांधवांचे बेमुदत उपोषण; २१ डिसेंबरच्या निवेदनाची दखल घेतली नाही

By अनिल गवई | Updated: January 2, 2024 16:20 IST2024-01-02T16:18:35+5:302024-01-02T16:20:02+5:30

आदिवासी कोळी समाज बांधवांच्या विविध मागण्यांसाठी  बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारपासून आदिवासी कोळी समाज बांधवांच्यावतीने बेमुदत उपोषणास सुरूवात करण्यात आली.

Indefinite hunger strike of tribal Koli brothers | आदिवासी कोळी बांधवांचे बेमुदत उपोषण; २१ डिसेंबरच्या निवेदनाची दखल घेतली नाही

आदिवासी कोळी बांधवांचे बेमुदत उपोषण; २१ डिसेंबरच्या निवेदनाची दखल घेतली नाही

खामगाव:  आदिवासी कोळी समाज बांधवांच्या विविध मागण्यांसाठी  बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारपासून आदिवासी कोळी समाज बांधवांच्यावतीने बेमुदत उपोषणास सुरूवात करण्यात आली.
जिल्हाधिकार्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनानुसार आदिवासी कोळी महादेव जमातीला अनुसुचित जमातीचे प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र देण्याच्या प्रमुख मागणीसाठी २१ डिसेंबर रोजी जिल्हाधिकार्यांमार्पत अमरावती विभागीय आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आले.  या निवेदनावर कोणत्याच प्रकारची दखल घेण्यात आली नाही.

तसेच बेरार प्रांतातील पाल पारधी, राज पारधी, गाव पारधी, हरण शिकार पारधी या जातीचा विमुक्ती जाती अ मध्ये येतात. मात्र, नाम साध्यर्माचा लाभ घेऊन त्यांनी अनुसुचित जमातीचे प्रमाणपत्र मिळविले आहे. उपरोक्त जातीचे प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे. तसेच आदिवासी कोळी जमातीला अनुसुचित जमातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी गणेश पांडुरंग इंगळे, गजानन धाडे, संदीप सपकाळ यांनी मंगळवारपासून बेमुदत उपोषणास सुरूवात केली आहे.

Web Title: Indefinite hunger strike of tribal Koli brothers