शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यार्थ्यांना शारीरिक अन् मानसिक शिक्षा देण्यावर बंदी; शिक्षण विभागाने जारी केली नवी नियमावली
2
"वेदनेतून घेतलेला निर्णय, तुमच्या विश्वासाला..."; तेजस्वी घोसाळकरांचं शिवसैनिकांना भावनिक पत्र
3
आज एक चमकणारी एसयुव्ही लाँच होणार; इंटरनेट कनेक्टेड, मोठी टचस्क्रीन सह बरेच काही मिळणार...
4
Crime: आधी पाच मुलांना गळफास लावला, नंतर बापानेही संपवले आयुष्य; दोन मुले वाचली
5
Viral Video: लग्नाआधी तरुणी एक्स बॉयफ्रेंडला जाऊन भेटली, व्हिडीओ सोशल मीडिया तुफान व्हायरल; पण गोष्ट खरी आहे का?
6
'धुरंधर'मधील व्हायरल गाण्यावर शाहरुखनेही केला डान्स? Video व्हायरल; किंग खानचे 'जबरा फॅन' म्हणाले...
7
BMC निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या महिला नेत्याचा भाजपात प्रवेश होणार
8
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य,१५ डिसेंबर २०२५: नशिबाची मिळणार साथ, आज सर्वत्र लाभच लाभ 
10
२ गोळ्या झेलूनही दहशतवाद्याकडून हिसकावली बंदूक; अखेर कोण आहे सिडनीतील हा 'Brave Man'?
11
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
12
विरार-अलिबाग कॉरिडॉर सहा जोडण्यांद्वारे महानगरांना कनेक्ट करणार; ७५ हेक्टरवरील ५०४३ खारफुटी बाधित होणार
13
बापरे! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला सोसायटीतील व्यक्तीकडून मारहाण, डोक्याला गंभीर दुखापत
14
दोन वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या महाराष्ट्रातील आरोपीला फाशीच, राष्ट्रपतींनी फेटाळली याचिका
15
लोकलच्या फुटबोर्डावर उभे राहणे निष्काळजीपणा नव्हे, तर..; कोर्टानेच कान टोचले... आतातरी शहाणे व्हा!
16
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
17
कोट्यवधी रुपयांची अफरातफर; भ्रष्टाचार केला म्हणून चीनच्या बँकरला मृत्युदंड
18
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
19
बाइक टॅक्सीचालकाचा तरुणीवर अतिप्रसंग; धैर्याने प्रतिकार करीत गाठले पोलिस ठाणे
20
संपादकीय : महायुतीचा नवा बूस्टर..! नागपूर अधिवेशनात चर्चा, मुनगंटीवारांची सभागृहात तुफान टोलेबाजी
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणाचा कोटा ५० टक्क्यांच्यावर वाढवा- प्रतापराव जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2021 10:55 IST

Prataprao Jadhav on Reservation : ५० टक्क्यांची आरक्षणाची मर्यादा वाढवून द्यावी अथवा या संबंधिचे अधिकार राज्याला द्यावे अशी आग्रही मागणी खा. प्रतापराव जाधव यानी १० ऑगस्ट रोजी लोकसभेत केली.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: मराठा आणि धनगर समाजाची राज्यातील अवस्था बिकट आहे. आज ५० टक्के मराठा समाज भूमिहीन आहे. पोटभरण्यासाठी स्थलांतरीत होत आहे. त्यामुळे या समजाला आरक्षणाची गरज आहे. सोबतच धनगर समाजाचीही आरक्षणाची जुनी मागणी असून या दोन्ही समाजाला आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने ५० टक्क्यांची आरक्षणाची मर्यादा वाढवून द्यावी अथवा या संबंधिचे अधिकार राज्याला द्यावे अशी आग्रही मागणी खा. प्रतापराव जाधव यानी १० ऑगस्ट रोजी लोकसभेत केली.१२७ व्या घटनादुरुस्ती संशोधन विधेयकाबाबत खा. प्रतापराव जाधव यांनी चर्चेत भाग घेत त्यांची या मुद्द्यावरील भूमिका मांडली. पुढे बोलताना ते म्हणाले देशातील राज्यामध्ये वेगवेगळ्या समाजाची मागणी असलेले आरक्षण देण्याचा अधिकार या विधेयकामुळे त्या ठिकाणी मिळणार आहे. महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. गुजरातमध्ये पटेल समाज, राजस्थान मध्ये गुर्जर व हरियाणामध्ये जाट समाज व इतर राज्यांमध्ये वेगळे समाजासाठी आरक्षणाबाबत आंदोलनं सुरू आहेत. आता जर राज्यांना हे अधिकार मिळाले आणि त्यांनी जर कोणाला ओबीसी मध्ये, कोणाला एससी, कोणाला एसटीमध्ये समाविष्ट केलं तर पूर्वीचाच राज्यांचा आरक्षणाचा कोटा पन्नास टक्क्यांचा पूर्ण झालेला आहे. आता त्यात आणखी संख्या वाढली तर या कोट्याच्या बाहेर तो आकडा जाईल. त्यामुळे आरक्षण कसे मिळेल, हा प्रश्न आहे. परिणामी या विधेयकामुळे राज्या-राज्यात समाजा -समाजामध्ये वाद वाढून आणखी असंतोष उफाळून येईल अशी शक्यता आहे. केंद्राने राज्यांना समाजाला आरक्षण देण्याचे अधिकार या विधेयकाने दिले आहे. पण जी आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा आहे, ती लोकसंख्येच्या अनुरूप वाढवून देण्याची कार्यवाही झाली अथवा तशा प्रकारचे संशोधन या बिलामध्ये केलं तर शंभर टक्के या बिलाला पाठिंबा राहील असेही खासदार प्रतापराव जाधव याप्रसंगी म्हणाले.तत्कालीन महाराष्ट्रातील भाजपच्या राज्य सरकारने १६ टक्के आरक्षण मराठा समाजाला दिलं होतं. आजही आमचे महाविकास आघाडीचे महाराष्ट्र राज्य सरकार आरक्षण द्यायला तयार आहे. पण जर ५० टक्क्यांच्या वर असलेला कोटा १६ टक्क्यांनी वाढवून मिळाला तर मराठ्यांना आरक्षण देऊ शकतो आणि आणखी ५ टक्के कोटा वाढवून मिळाला तर धनगर समाजालाही आरक्षणाचा लाभ देता येऊ शकेल असे त्यांनी बोलतांना सांगितले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाPrataprao Jadhavप्रतावराव जाधवreservationआरक्षण