मलेरियाच्या रूग्णांमध्ये वाढ!

By Admin | Updated: August 10, 2016 00:37 IST2016-08-10T00:37:06+5:302016-08-10T00:37:06+5:30

बुलडाणा जिल्ह्यात वर्षभरात ४ लाख ७१ हजार रुग्णांनी मलेरिया निदानासाठी रक्त तपासणी.

Increase in malaria patients! | मलेरियाच्या रूग्णांमध्ये वाढ!

मलेरियाच्या रूग्णांमध्ये वाढ!

बुलडाणा, दि. 0९ : वातावरणात होणारे बदल, त्यातच डासांची उत्पत्ती, यामुळे जिल्ह्यात मलेरियाचा आजार डोकेवर काढत आहे. सध्या रूग्णालये फुल्ल असून, रूग्णांच्या संख्येत वाढच होत आहे.
आजारावर नियंत्रण मिळविण्याकरिता आरोग्य प्रशासनाच्यावतीने विविध जनजागृती कार्यक्रम आणि नागरिकांना स्वच्छेतेचे महत्व पटवून देण्याचे काम सुरु आहे. तसेच मलेरियाची तपासणीही करण्यात येत आहे. २0१५-१६ या वर्षभरात जिल्ह्याभरातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्र व इतर खाजगी केंद्रावरुन ४ लाख ७१ हजार रुग्णांनी मलेरिया निदानासाठी रक्त तपासणी केली. डासांना पोषक वातावरण मिळत असल्यामुळ मलेरीया रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

रिक्तपदांचा ताप
जिल्ह्याभरातील ५५ प्राथमिक आरोग्य केंद्रातून मलेरिया निदानासाठी रक्ततपासणी केली जाते. मात्र या प्रा.आ.केंद्रांमध्ये २९ पद रिक्त आहे. सदर रिक्तपद भरण्यासंदर्भात जिल्हा आरोग्य विभागाकडून वेळोवेळी शासनाकडे विनंती करण्यात आली. या रिक्तपदामुळे जिल्हा हिवताप विभागाचा ताप मात्र वाढला आहे.

पाच वर्षाचा हिवतापाचा आलेख
वर्ष                 रक्ततपासणी
२0११-१२           ३९३0८0
२0१२-१३           ४२१२७0
२0१३-१४           ४0३0३६
२0१४-१५           ४१४३५१
२0१५-१६           ४७१९२५

Web Title: Increase in malaria patients!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.