अनुसूचित जमातीमध्ये समावेश करा
By Admin | Updated: July 31, 2014 01:26 IST2014-07-31T01:22:23+5:302014-07-31T01:26:54+5:30
धनगर समाजाच्यावतीने निवेदन

अनुसूचित जमातीमध्ये समावेश करा
नांदुरा : धनगर समाजाचा अनुसुचित जमातीमध्ये समावेश करण्यात यावा, अशी मागणी एका निवेदनाव्दारे धनगर समाजाच्यावतीने तहसिलदार यांचेकडे २८ जुलै रोजी करण्यात आली आहे. याबाबत दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, भारतीय राज्य घटनेमध्ये धनगर ही जात अनुसुचित क्र. ३६ वर असुन गेली ६५ वर्षे या जातीचा अजुनही या संवर्गात समावेश केल्या गेला नाही. त्यामुळे एकप्रकारे ह्या समाजावर अन्याय होत आहे, असेही या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर मल्हार सेना जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न पाचपोर, धनगर महासंघ जिल्हा उपाध्यक्ष साहेबराव फासे, कोषाध्यक्ष महादेव बोरसे, भानुदास तितरे, गजानन नवलकर, प्रविण वसतकार, सुगदेव कवळकर, कैलास डांगे, मधुकर कवळे, सुगदेव खराटे, दगडू खोंदले, महादेव चिंचोलकर, निंबाजी बाजोडे यांचेसह धनगर समाज बांधवांच्या स्वाक्षर्या आहेत.