शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव उत्साहात, खामगाव शहरात भव्य शोभायात्रेने अभिवादन

By अनिल गवई | Updated: April 21, 2024 13:38 IST

Buldhana News: संपूर्ण विश्वाला अहिंसा आणि शांततेचा संदेश देणारे भगवान महावीर यांचा जन्मकल्याणक महोत्सव रविवारी खामगावात उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी सराफा  येथील जैन मंदिरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली.

- अनिल गवईखामगाव - संपूर्ण विश्वाला अहिंसा आणि शांततेचा संदेश देणारे भगवान महावीर यांचा जन्मकल्याणक महोत्सव रविवारी खामगावात उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी सराफा  येथील जैन मंदिरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शहरातील विविध मार्गांवरून मार्गक्रमण केल्यानंतर या शोभायात्रेचा देवजी खिमजी मंगल कार्यालयात तर दुस-या शोभायात्रेचा घाटपुरी नाका येथे समारोप झाला.

श्री चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर आणि सकल जैन समाजाच्या वतीने आयोजित शोभायात्रेत मातृशक्तीचा मोठ्या संख्येने सहभाग होता. भगवान महाविरांच्या शांततेचे संदेश असलेले विविध फलक हातात घेत, तरूणी आणि मातृशक्तीने शोभायात्रेत जनजागृती केली.  या शोभायात्रेत भगवान महावीर यांची आकर्षक मूर्ती असलेला चित्ररथ सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. त्याचवेळी बैलगाडीतून भगवान महाविरांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली.  सराफा येथील जैन मंदिरातून सुरू झालेली शोभायात्रा फरशी, मेनरोड, महावीर चौक, अकोला बाजार, गांधी चौक, अग्रेसन चौकमार्गे देवजी खिमजी मंगल कार्यालयात पोहोचली. महावीर चौकात शोभायात्रेचे जल्लोषात स्वागत झाले.  अग्रसेन चौकात राष्ट्रीय स्वयंसेवक संघांच्यावतीने शोभायात्रेचे स्वागत झाले.यावेळी थंडपाण्याचेही वितरण झाले. शहर पोलीस स्टेशन समोरील गांधी बागेनजीक असलेल्या किर्ती स्तंभाला शोभायात्रेत सहभागी असलेल्या जैन समाज बांधवांनी वंदन केले. मातृशक्तीने किर्तीस्तंभाचे पूजन केले. यावेळी युवती आणि तरूणींनी भक्तीगीतावर सामुहिक नृत्य सादर केले. त्यानंतर बालाजी प्लॉट मार्गे अरजन खिमजी मंगल कार्यालयात शोभायात्रेचा समारोप झाला. तर दुसरी शोभायात्रा प्रमुख मार्गाने घाटपुरी नाका भागात पोहोचल्यानंतर समारोप झाला.

शोभायात्रेतील सहभागींचे स्वागतसकल जैन समाज, जैन समाजाच्या विविध संघटनांच्या वतीने महावीर जयंतीनिमित्त निघालेल्या शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. महावीर चौकात यात्रेवर पृष्पवृष्टी करण्यात आली.  अकोला बाजारात थंड पेय, चहा, सरबताचे वितरण करून शोभायात्रेचे स्वागत झाले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाMahavir Jayantiमहावीर जयंती