शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवस मारहाण, तिसऱ्या दिवशी छातीवर पाय ठेवून वडिलांना पाजले विष! बुलढाण्यतील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 15:32 IST

बुलढाण्यात मुलाने वडिलांना मारहाण करुन विष पाजल्याची घटना घडली

Buldhana Crime: बुलढाणाच्या खामगाव तालुक्यातील शंकरनगर भागात मुलाने जन्मदात्या बापाला संपवण्याचा प्रयत्न केला. मुलाने वडिलांना सतत मारहाण करत अखेर विष पाजण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी मुलाविरुद्ध खामगाव शहर पोलिस ठाण्यात २३ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही धक्कादायक घटना ४ ते ६ ऑगस्ट दरम्यान घडली. त्यानंतर इतक्या दिवसांनी ही घटना समोर आली आहे.

प्रल्हाद मधुकर उमाळे (५०) हे शंकरनगर येथे पत्नीसमवेत राहतात. त्यांचा मुलगा शुभम प्रल्हाद उमाळे (२४) हा वारंवार वाद घालत त्यांना त्रास देत असे. ४ ऑगस्ट रोजी दुपारी प्रल्हाद उमाळे पत्नीला किरकोळ खर्चासाठी पैसे देत असताना शुभमने संतापून वडिलांना मारहाण केली. त्यानंतर संध्याकाळी पुन्हा त्याने वडिलांवर हल्ला केला.

५ ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजताच्या सुमारास आरोपी शुभम हा मद्यधुंद अवस्थेत घरी आला व शिवीगाळ करून वडिलांना मारहाण केली. दरम्यान, जखमी प्रल्हाद उमाळे यांना पत्नीने सरकारी रुग्णालयात नेले. त्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आणि ते घरी आले.

आपल्या विरोधात तक्रार दिल्याची माहिती कळताच आरोपी शुभम संतापला. त्याने ५ ऑगस्टच्या रात्री पुन्हा वडिलांना मारहाण केली. शुभमचा राग अजूनही गेला नव्हता. एवढ्यावर न थांबता त्याने ६ ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजता वडील घरी झोपलेले असताना त्यांच्या छातीवर पाय ठेवून गळा दाबला आणि जबरदस्तीने विष पाजलं. त्यामुळे त्यांना विषबाधा झाली आणि उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

दरम्यान, याप्रकरणी पोलिस तक्रार आणि तक्रारदारांच्या जबाबावरून शुभम उमाळे याच्याविरुद्ध २३ ऑगस्ट रोजी कलम १०९(१), ११५(२), ३५२, ३५१ (१) (२) भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस