बुलढाण्यात दहा रुपयाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचा विनयभंग
By ब्रह्मानंद जाधव | Updated: July 18, 2023 17:38 IST2023-07-18T17:37:29+5:302023-07-18T17:38:05+5:30
पीडित मुलीच्या आईने बुलढाणा ग्रामीण पोलीस तक्रार दिली आहे.

बुलढाण्यात दहा रुपयाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचा विनयभंग
बुलढाणा : ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात ६० वर्षीय व्यक्तीने ११ वर्षीय अल्पवयीन अल्पवयीन मुलीला दहा रुपयाचे अमिष दाखवून विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी आरोपी विरुद्ध विनयभंग, पॉक्सो व ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला न्यायालय समोर हजर केले असता त्याची १८ जुलै रोजी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
या बाबत पीडित मुलीच्या आईने बुलढाणा ग्रामीण पोलीस तक्रार दिली आहे. त्यानुसार, दुपारच्या सुमारास पीडित मुलगी दुकानातून साखर आणण्यासाठी जात असताना आरोपी अब्दुल शहा तुकडू शहा याने पीडितेला १० रुपये देऊन तिचा वाईट उद्देशाने हात धरून बोळीत ओढले व विनयभंग केला. या तक्रारीवरून आरोपी अब्दुल शहा तुकडू शहा याच्या विरुद्ध विनयभंग, पॉक्सो व ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हे दाखल करून आरोपीला अटक करण्यात आले आहे. आरोपीला न्यायालय समोर हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी १८ जुलै रोजी दिली.