निमगाव गुरू ते निमगाव फाटा रस्त्याचे काम दर्जेदार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:35 IST2021-04-20T04:35:56+5:302021-04-20T04:35:56+5:30

निमगाव गुरू येथील रस्त्याची दयनीय अवस्था झाली हाेती़ त्यामुळे, निमगाव गुरूचे तत्कालीन सरपंचपती अनिल चित्ते यांच्यासह गावकऱ्यांनी तत्कालीन ...

Improve the quality of road work from Nimgaon Guru to Nimgaon Fata | निमगाव गुरू ते निमगाव फाटा रस्त्याचे काम दर्जेदार करा

निमगाव गुरू ते निमगाव फाटा रस्त्याचे काम दर्जेदार करा

निमगाव गुरू येथील रस्त्याची दयनीय अवस्था झाली हाेती़ त्यामुळे, निमगाव गुरूचे तत्कालीन सरपंचपती अनिल चित्ते यांच्यासह गावकऱ्यांनी तत्कालीन माजी आमदार डॉ़ शशिकांत खेडेकर यांच्याकडे रस्त्याची मागणी केली होती़ त्याला त्यांनी प्रतिसाद देत दूरदृष्टी नियोजनातून जिल्हा परिषदेच्या मालकीचा रस्ता जिल्हा परिषदेला निधी नसल्यामुळे आ. खेडेकर यांनी अधिवेशनात विषय मांडला़ तसेच हा रस्ता राज्य शासनाच्या मालकीचा करून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर करून घेतला़ या रस्त्यासाठी दोन कोटी अठरा लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे़ या रस्त्याचे काम निकृष्ट हाेत असल्याचा आराेप चित्ते यांनी निवेदनात केला आहे़ प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत निमगाव गुरू ते निमगाव फाटा या रस्त्याचे काम अत्यंत धिम्या गतीने व निकृष्ट दर्जाचे सुरू आहे़ या रस्त्याच्या कामाची चाैकशी करून दाेषीवर कारवाई करण्याची तसेच रस्त्याचे काम दर्जेदार करण्याची मागणी चित्ते यांनी निवेदनात केली आहे़

Web Title: Improve the quality of road work from Nimgaon Guru to Nimgaon Fata