पोलिसांकडून अवैध दारूभट्टय़ांवर छापे
By Admin | Updated: June 24, 2015 01:58 IST2015-06-24T01:58:51+5:302015-06-24T01:58:51+5:30
ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

पोलिसांकडून अवैध दारूभट्टय़ांवर छापे
खामगाव : विषारी दारू प्राशन केल्याने १0१ जणांचा बळी गेल्याची राज्याला हादरवून सोडणारी घटना मुंबई येथील मालवणीमध्ये घडली. सदर घटनेची धास्ती पोलीस प्रशासनाने घेऊन स्थानिक ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अधिकार्यांनी परिसरात सुरू असलेल्या अवैध दारुभट्टय़ांवर छापे मारून चौघांना ताब्यात घेतले.
स्थानिक एएसपी पथक व ग्रामीण पोलीस ठाणे यांच्या संयुक्त कारवाईत सोमवारी तालुक्यातील चितोडा येथील नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध हातभट्टीवर छापा टाकून वासुदेव दशरथ हिवाळे (५0) याला ताब्यात घेवून ३0 लिटर मोहाची दारू (अंदाजे किंमत ३५00) जप्त केली, तर दुसर्या कारवाईत पारखेड येथील दोन ठिकाणी सुरू असलेल्या हातभट्टी दारूअड्डय़ावर धाड टाकून आत्माराम कुराळे (५५), संतोष लक्ष्मण कुराळे (६५), या दोघांना अटक करून त्यांच्याजवळून २0 लिटर हातभट्टीची दारु (किंमत २२00 रुपये) जप्त केली. याच दरम्यान तालुक्यातील अंबिकापूर येथे विनापरवाना देशी दारुची विक्री करणार्या दीपक जयराम सरदार (२५) यास ताब्यात घेऊन त्याच्याजवळून देशी दारूच्या ४५ नग बॉटल (किंमत २ हजार ३५0 रुपये) जप्त केल्या. वरील चौघांविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ६५ ख (ड) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमध्ये एएसपी पथकाचे गुलाबराव काळे, पीएआय सचिन इंगळे, एनपीसी मेटांगे व गवई यांचा सहभाग होता. अवैध दारूविक्री करणार्यांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.