अवैधरित्या साठवलेला तांदूळ व गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 10:28 AM2020-07-15T10:28:13+5:302020-07-15T10:28:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मलकापूर :   गोडाऊन मध्ये अवैधरित्या साठवून ठेवलेले तांदूळ व गुटखा अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या पथकाने ...

Illegally stored rice and gutkha seized | अवैधरित्या साठवलेला तांदूळ व गुटखा जप्त

अवैधरित्या साठवलेला तांदूळ व गुटखा जप्त

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर:   गोडाऊन मध्ये अवैधरित्या साठवून ठेवलेले तांदूळ व गुटखा अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या पथकाने धाड टाकुन अंदाजे ३३ लाखांचा मुद्देमाल जप्तीची कारवाई १४ जुलै रोजी रात्री राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वरील कुंड या परीसरात केली आहे.
मलकापुर येथून जवळ असलेल्या कुंड या गावानजिक एका गोडाऊन मधे अवैध रित्या तांदूळ व गुटखा साठवून ठेवला असल्याची गोपनीय माहिती अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या पथकाला मिळाली होती. त्या महितीच्या आधारे सदर गोडाऊन वर छापा टाकला असता तेथे तांदूळाचे ४६६ कट्टे, तसेच महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला मानवी आरोग्यास अपायकारक असलेला विमल गुटखा तसेच चार वाहने यांचा अंदाजे 33 लाखांचा मुद्दे माल जप्त केला आहे.     गोडाऊन मालक आतिकुर रहेमान शफीकुर रहेमान रा. पारपेठ, मलकापुर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मलकापुर तहसील चे पुरवठा अधिकारी व कर्मचाऱ्यानी घटनास्थळावर येऊन पंचनामा केला आहे. तसेच गुटखा संबंधित कारवाई अन्न व प्रशासन कडे वर्ग करण्यात आली आहे.सदरची कार्यवाही बुलडाणा जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांचे आदेशाने, अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत खामगाव यांचे मार्गदर्शनाखाली त्यांचे पथकातील पिएसआय चंद्रकांत बोरसे, पोहेकॉ. सुनील देव, पोना. कृष्णा नारखेडे, सुधाकर थोरात, देवेंद्र शेळके, प्रदीप मोठे, पोकॉ. रवींद्र कन्नर, मपोना. मोनाली कुळकर्णी, मपोका. निर्गुना सोनटक्के यांनी केली.

Web Title: Illegally stored rice and gutkha seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.