रेतीची अवैध वाहतूक, ट्रकसह १२ लाखांचा मुद्देमाल जप्त; पिंपळगाव राजा पोलीसांची धडक कारवाई
By अनिल गवई | Updated: May 2, 2023 12:38 IST2023-05-02T12:38:07+5:302023-05-02T12:38:19+5:30
ताब्यातील ट्रकसह तीन ब्रास चोरीची रेती असा एकुण १२ लाख ९ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल.

रेतीची अवैध वाहतूक, ट्रकसह १२ लाखांचा मुद्देमाल जप्त; पिंपळगाव राजा पोलीसांची धडक कारवाई
खामगाव: तालुक्यात गत काही दिवसांपासून अवैध गौण खनिजाची मोठ्याप्रमाणात वाहतूक केली जात आहे. रेतीची चोरटी वाहतूक केली जात असतानाच, पिंपळगाव राजा पोलीसांनी ३ ब्रास अवैध वाळूसह एक ट्रक जप्त केला. ही कारवाई सोमवारी रात्री करण्यात आली.
याप्रकरणी पिंपळगाव राजा पोलीस स्टेशनमध्ये दाखल तक्रारीनुसार, पिंपळगाव राजा येथील लहान पुलाजवळ सोमवारी रात्री ११ वाजता दरम्यान, नांदुरा तालुक्यातील मामुलवाडी येथील श्रीकृष्ण रमेश जाधव एमएच २८ बीबी ३००२ या वाहनातून रेतीची अवैध वाहतूक करताना आढळून आला. त्याच्या ताब्यातील ट्रकसह तीन ब्रास चोरीची रेती असा एकुण १२ लाख ९ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल. याप्रकरणी एएसआय संजय कांडोले यांच्या तक्रारीवरून आरोपी िवरोधात भादंवि कलम ३७९, सहकलम ३ (१), १८१ मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास पिंपळगाव राजा पोलीस करीत आहेत.