दारूची अवैध वाहतूक; दोघांना अटक

By Admin | Updated: January 31, 2017 02:52 IST2017-01-31T02:52:49+5:302017-01-31T02:52:49+5:30

मोटारसायकल जप्त करून दोघांना अटक केली.

Illegal traffic of alcohol; Both arrested | दारूची अवैध वाहतूक; दोघांना अटक

दारूची अवैध वाहतूक; दोघांना अटक

खामगाव, दि. ३0- राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने करमोडा येथे सोमवारी छापा टाकून अवैधरीत्या वाहतूक होत असलेला दारू साठा तसेच मोटारसायकल जप्त करून दोघांना अटक केली.
ही कारवाई उत्पादन शुल्क बुलडाणा विभागाचे अधीक्षक एस.एल. कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ए.एम. शेख दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क शेगाव तसेच विलास ग. पाटील प्रभारी निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क खामगाव यांचे पथकातील जवान अमोल एम. सोळंके, एस.आर. एडसकर सहायक दुय्यम निरीक्षक यांनी केली. मिळालेल्या माहितीनुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने करमोडा, ता.संग्रामपूर शिवारात छापा टाकला असता विष्णू सपकाळ (वय २८), नलीन वानखडे (वय २४) दोघेही रा.शेवंगा (शेतखेड) ता. संग्रामपूर हे मोटारसायकलवरून देशी दारूची वाहतूक करीत असता आढळून आले. या दोघांच्या ताब्यातील ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
 

Web Title: Illegal traffic of alcohol; Both arrested