रुईखेड मायंबा : धाड पोलीस स्टेशन अंतर्गत विविध अवैध धंद्यांना उत आलाअसून, दर सहा महिन्यांनी ठाणेदाराची बदली करण्यात येत आहे. त्यामुळेपोलिस कर्मचाऱ्यांसह सामान्य नागरिकही त्रस्त झाले आहेत. धाड परिसरात वरली मटका, अवैध देशी दारू विक्री यासह अनेक अवैध धंदेराजरोसपणे चालत. त्यामुळे नोव्हेंबर २०१६ मध्ये ठाणेदार पदाची सुत्रेसुनिल जाधव यांनी स्वीकारल्यानंतर परिसरातील जनतेला कायदा आणि सुव्यवस्थाअबाधित राहील, अशी अपेक्षा होती. परंतु अवैध सुरूच आहेत.शिवसेनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण देखीलकरण्यात आले. त्यामुळे पर्यायाने जिल्हा पोलीस प्रशासनाला ठाणेदार सुनिलजाधव यांची बदली करण्यात आली.नुकतेच २९ एप्रिल रोजी संग्राम पाटील यांनी ठाणेदार पदाची सुत्रे हातीघेतली. बुलडाणा मुख्यालयी असलेल्या संग्राम पाटील यांचा बऱ्यापैकी चांगलावचक होता. अनेक महत्वाच्या तपासामध्ये त्यांची महत्वाची भूमिका होती.त्यामुळे धाड परिसरावर आपली पकड ते मजबूत करतील, अशी अपेक्षा आहे.
धाड परिसरात अवैध धंद्यांना उत
By admin | Updated: May 5, 2017 13:50 IST