धाड परिसरात अवैध धंद्यांना उत

By Admin | Updated: May 5, 2017 13:50 IST2017-05-05T13:50:52+5:302017-05-05T13:50:52+5:30

धाड पोलीस स्टेशन अंतर्गत विविध अवैध धंद्यांना उत आलाअसून, दर सहा महिन्यांनी ठाणेदाराची बदली करण्यात येत आहे.

The illegal trade in the forage area | धाड परिसरात अवैध धंद्यांना उत

धाड परिसरात अवैध धंद्यांना उत

रुईखेड मायंबा : धाड पोलीस स्टेशन अंतर्गत विविध अवैध धंद्यांना उत आला
असून, दर सहा महिन्यांनी ठाणेदाराची बदली करण्यात येत आहे. त्यामुळे
पोलिस कर्मचाऱ्यांसह सामान्य नागरिकही त्रस्त झाले आहेत.
 धाड परिसरात वरली मटका, अवैध देशी दारू विक्री यासह अनेक अवैध धंदे
राजरोसपणे चालत. त्यामुळे नोव्हेंबर २०१६ मध्ये ठाणेदार पदाची सुत्रे
सुनिल जाधव यांनी स्वीकारल्यानंतर परिसरातील जनतेला कायदा आणि सुव्यवस्था
अबाधित राहील, अशी अपेक्षा होती. परंतु अवैध सुरूच आहेत.
शिवसेनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण देखील
करण्यात आले. त्यामुळे पर्यायाने जिल्हा पोलीस प्रशासनाला ठाणेदार सुनिल
जाधव यांची बदली करण्यात आली.
नुकतेच २९ एप्रिल रोजी संग्राम पाटील यांनी ठाणेदार पदाची सुत्रे हाती
घेतली. बुलडाणा मुख्यालयी असलेल्या संग्राम पाटील यांचा बऱ्यापैकी चांगला
वचक होता. अनेक महत्वाच्या तपासामध्ये त्यांची महत्वाची भूमिका होती.
त्यामुळे धाड परिसरावर आपली पकड ते मजबूत करतील, अशी अपेक्षा आहे.

Web Title: The illegal trade in the forage area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.