सिंदखेडराजा येथे सागवनाची अवैध कत्तल

By Admin | Updated: August 13, 2014 23:35 IST2014-08-13T23:28:48+5:302014-08-13T23:35:56+5:30

सिंदखेडराजा वनविभागात वृक्षांची सर्रास कत्तल केली जात आहे.

Illegal slaughter of Sagvarna at Sindhkhedraja | सिंदखेडराजा येथे सागवनाची अवैध कत्तल

सिंदखेडराजा येथे सागवनाची अवैध कत्तल

सिंदखेडराजा : सिंदखेडराजा तालुक्यात किमान ५00 हेक्टर परिसरात आजही वन विभागाची जंगले असून, त्या भागात सागवनसह इतर मोठी वृक्ष अस्तित्वात आहेत; मात्र या वृक्षांची सर्रासपणे कत्तल केली जात आहे. वन विभागाच्या दुर्लक्षीतपणामुळे ती जंगले नष्ट होत असून, त्यावर तत्काळ पायबंद घालण्याची गरज आहे.
तालुक्यात हनवतखेड, सिंदखेडराजा आडगावराजा, सोनुशी, भोसा, दुसरबीड या भागात वन विभागाची जमीन असून, ५00 हेक्टरवर सागवन, पिंपळ, निंब या शेकडो प्रकारची वृक्ष मोठय़ा प्रमाणात आहे. वन विभागांतर्गत येणार्‍या जंगलात वन विभागाचे लक्ष नसल्याने मोठय़ा प्रमाणात सागवानसह इतर वृक्षांची मोठय़ा प्रमाणात कत्तल होत असून, ते परस्पर विकल्या जात आहेत. वृक्षतोडी करुन ती जमीन वहितीखाली काढल्या जात आहे. एकीकडे शासन वृक्ष लागवडीचे महत्त्व सांगून त्याचे संगोपन करण्याची माहिती जबाबदारी टाकत असताना दुसरीकडे जंगल तोडीकडे लोक वळत आहे. मोठय़ा प्रमाणात वृक्षतोड होत असल्याने पर्यावरणाचा र्‍हास होत आहे. त्याचा परिणाम पर्जन्यवृष्टीवर होत असून, पावसाळ्यात पाऊसच नाहीसा झाला आहे. जून, जुलै आणि अर्धा ऑगस्ट महिना संपत आला तरी पाहिजे तसा पाऊस सिंदखेडराजा तालुक्यात कोठेच पडला नाही. मे महिन्यात ज्याप्रमाणे ऊन पडते, अंगाला चटके बसतात, अंगाची लाही लाही होते, त्याप्रमाणे ऑगस्ट महिन्यात चित्र अनुभवयास मिळत आहे. नदी, नाले, तलाव कोरडी पडली आहेत. दररोज निसर्गात होणारा बदल याला कारणीभूत आहे. वृक्षाची होणारी कत्तल वेळीच थांबली नाही तर या भागात वाळवंट झाल्याचे चित्र निर्माण होईल. मेहकर विभागातील वनरक्षकाशी संपर्क साधला असता त्यांनी ज्या भागात अवैध वृक्षतोड झाली असेल किंवा होत असेल त्या भागात तत्काळ कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगीतले.

Web Title: Illegal slaughter of Sagvarna at Sindhkhedraja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.