अवैध व्यवसायांना उधाण

By Admin | Updated: September 15, 2014 00:49 IST2014-09-15T00:49:17+5:302014-09-15T00:49:17+5:30

मेहकर तालुक्यात अवैध गुटखा व दारु विक्रीसह अवैध धंद्यांना उत.

Illegal occupations | अवैध व्यवसायांना उधाण

अवैध व्यवसायांना उधाण

मेहकर : तालुक्यातील उमरा देशमुख परिसरात वरली, मटका, जुगार सह अवैध दारुविक्रीला उधान आले आहे. तसेच अवैध गुटखा विक्रीही जोमात सुरू असून ग्रामीण भागात दुपारच्या वेळेत जुगाराचे डाव चांगलेच रंगत आहेत. याकडे प्रशासनाचे मात्र साफ दुर्लक्ष होत आहे.
अवैध गुटखा व दारु विक्रीसह वरली, मटका, जुगार यासारख्या अवैध धंद्यांनीही उमरा देशमुख परिसरात चांगलाच जम बसविला आहे. पोलिस प्रशासनही याकडे डोळेझाक करीत असल्याने अवैध धंदे चालविणार्‍यांना पोलिसांचे अभय निर्माण झाले आहे. परिसरात राजरोस सुरु असलेल्या जुगार अड्डयावर पोलिसांची आजपर्यंत एकदाही धाड पडली नाही. त्यामुळे या परिसरात पोलिसांचेही अभय निर्माण होत आहे. यासंदर्भात वरिष्ठांनी दखल घेऊन परिसरातील अवैध धंदे तात्काळ बंद करण्याची यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Web Title: Illegal occupations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.