अवैध दारू विक्रेत्यांना अटक
By Admin | Updated: May 6, 2017 02:32 IST2017-05-06T02:32:36+5:302017-05-06T02:32:36+5:30
अवैधरीत्या देशी दारूची विक्री करणा-यांना दोन जणांना धामणगाव बढे शिवारात पोलिसांनी अटक केली.

अवैध दारू विक्रेत्यांना अटक
मोताळा : दारू विक्री बंदीनंतरही अवैधरीत्या देशी दारूची विक्री करणार्यांना दोन जणांना धामणगाव बढे शिवारात पोलिसांनी अटक केली. ही कारवाई ५ मे रोजी दुपारी करण्यात आली.
धामणगाव बढे पोलीस स्टेशन हद्दीत देशी दारूची अवैधरीत्या वाहतूक व विक्री करणारे दोन इसमांना ठाणेदार दीपक वळवी यांच्या नेतृत्वात पोहेकॉ येरळीकर, पोकॉ मदन मुळे, गणेश वाघ, प्रमोद राठोड यांनी सापळा रचून अटक केली. पोलिसांनी सदर दारुविक्रेत्यांकडून ४७ हजार ५00 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
न्यायालयाने महामार्गावरील दारूबंदीचा निर्णय दिल्यानंतर मोताळा व परिसरात मोठय़ा प्रमाणात अवैध दारू विक्री सुरू आहे.