ऑनलाइन शिक्षणात पटसंख्येकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2020 05:13 PM2020-12-18T17:13:19+5:302020-12-18T17:13:32+5:30

Education Sector News ड्रॉप झालेले विद्यार्थी शोधणार कसे, असा प्रश्न शिक्षण विभागासमोर आहे.

Ignoring Student numbers in online education | ऑनलाइन शिक्षणात पटसंख्येकडे दुर्लक्ष

ऑनलाइन शिक्षणात पटसंख्येकडे दुर्लक्ष

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा :  विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया झाल्यानंतर त्याची माहिती ही ऑनलाइन टाकण्यात येते. मात्र यावर्षीची जिल्ह्यातील इयत्तानिहाय पटसंख्या शिक्षण विभागाकडेच उपलब्ध नसल्याने ड्रॉप झालेले विद्यार्थी शोधणार कसे, असा प्रश्न शिक्षण विभागासमोर आहे. ऑनलाइन शिक्षणात पटसंख्येकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. 
मागील वर्षी जिल्हा परिषद, नगरपालिका यासह सर्व माध्यमांच्या अनुदानित, विनाअनुदानित शाळेतील विद्यार्थिसंख्या   पहिली ते बारावीपर्यंत पाच लाख १८ हजार ८५१ होती. परंतु यंदा यातील किती विद्यार्थी गायब झाले, हे शिक्षण विभागही सांगू शकत नाही.  एका वर्गातून दुसऱ्या वर्गात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दुसऱ्या वर्षीही सारखी असायला हवी. परंतु मागील वर्षाच्या तुलनेत दुसऱ्या वर्षात विद्यार्थ्यांची संख्या कमी होत असल्याने विद्यार्थी शोधण्यासाठी मिशन ड्रॉप बॉक्स सुरू करण्यात आले आहे. ही संख्या शून्यावर आणण्याचा उपक्रम शिक्षण विभागाकडून मागील वर्षी राबविला होता.


यावर्षी ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. मागील वर्षीची विद्यार्थिसंख्या पाहून जवळपास पूर्ण प्रवेश झालेले आहेत. यू डायस प्रणाली बंद असल्याकारणाने यावर्षीच्या विद्यार्थिसंख्येची माहिती मिळू शकली नाही. यावर्षी मुले ड्रॉपमध्ये नाहीत. 
-उमेश जैन, उप शिक्षणाधिकारी

Web Title: Ignoring Student numbers in online education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.