हातपंप दुरूस्तीकडे दुर्लक्ष

By Admin | Updated: November 22, 2014 23:47 IST2014-11-22T23:47:42+5:302014-11-22T23:47:42+5:30

देऊळगावराजा व सिंदखेडराजा तालुक्यात ६८७ हातपंप.

Ignore hand pump repair | हातपंप दुरूस्तीकडे दुर्लक्ष

हातपंप दुरूस्तीकडे दुर्लक्ष

देऊळगावराजा (बुलडाणा) : सध्या पाणीटंचाईचे सावट हळूहळू जाणवत असले तरी देऊळगावराजा, सिंदखेडराजा या दोन तालु क्यामध्ये असलेल्या एकूण ६८७ हातपंप दुरुस्तीसाठी केवळ एकच दुरुस्ती वाहन असून, यासाठी कर्मचारी अपुरे तसेच यंत्रणा असक्षम असल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे.
शासन स्तरावर ग्रामीण भागातील जनता तहानलेली राहू नये, यासाठी राज्यशासन दरवर्षी कोट्यवधी रुपयांची तरतूद करत अस ते. सध्या ग्रामीण भागात चौका-चौकामध्ये ग्रामपंचायतीने हातपंप बसविलेले आहेत. काही ठिकाणी मुबलक पाणीसाठा आहे. प्र त्येक गावामध्ये पाणीपुरवठय़ाची सार्वजनिक विहीर ग्रामपंचाय तीच्या ताब्यात असताना केवळ भारनियमनामुळे गावकर्‍यांना पाणीपुरवठा करणे शक्य होत नाही. यासाठी गावोगावी बोअर घेऊन त्यावर ग्रामपंचायत हातपंप बसविते, यासाठी शासनाचे शंभर टक्के अनुदान शासन स्तरावरुन देण्यात येते; मात्र सदर हातपंप दुरुस् तीसाठी प्रतिहातपंप रु. २000 चे शुल्क वार्षिक प्रमाणे भूजल सर्वेक्षक विभाग जि.प.बुलडाणा यांच्याकडून आकारण्यात येत असल्याची माहिती संबंधित विभागाचे पी.टी.बोरकर यांनी लोकम तशी बोलताना दिली. हातपंप दुरुस्तीबाबत शासनाची उदासीनता प्रत्येक खेड्यामध्ये सध्या दिसून येते. जिल्हा परिषद स्तरावर तालु क्याच्या ठिकाणी विविध पंचायत समित्यांवर पंचायत समिती सभा पती यांची समिती असते तर जिल्हा परिषदेवर जि.प.अध्यक्ष यांच्या अधिपत्याखाली जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती पंचायत समि तीखाली काम करतात.
देऊळगावराजा पंचायत समिती अंतर्गत एकूण ४८ ग्रामपंचायती आहेत तर सिंदखेडराजा पं.स.मध्ये ७९ ग्रामपंचायती आहेत. या दोन तालुक्यांमध्ये ग्रामीण भागामध्ये ६८७ हातपंप आहेत.
हातपंप वीजपुरवठा असो किंवा नसो, केवळ हाताने पंप मारल्यास केव्हाही पाणी उपलब्ध असते; परंतु या ६८७ पंपाची दुरुस्ती करण्यासाठी दे.राजा आणि सिं.राजा या दोन तालुक्यासाठी केवळ एकच दुरुस्ती वाहन उपलब्ध असून, यावर काम करणार्‍या कर्मचार्‍यांची संख्या अपुरी आहे, तर हातपंप दुरुस्तीबाबत ग्राम पंचायत सहकार्य करुन शुल्क भरत नसल्याची खंत भूजल सर्वेक्षण विभागाचे बोरकर यांनी व्यक्त केली तर देऊळगावराजा पंचायत समितीचे सहायक स्थापत्य अभियांत्रिक एस.जी.साळवे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, दुरुस्तीची गाडी (वाहन) दोन तालुक्यातून आठवड्यामधून आपल्या तालुक्याला एकदाच देण्यात येते, अशी परिस्थिती असताना हातपंप दुरुस्त करुन ग्रामीण जन तेची तहान भागविण्यासाठी शासनाने योग्य पाऊल उचलून पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा बामखेडचे सरपंच परमेश्‍वर घोंगे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.

Web Title: Ignore hand pump repair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.