शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

डाकसेवक व्हायचे, तर सायकल शिका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2017 02:31 IST

डाक विभागाची अट; ग्रामीण डाकसेवक पदांसाठी अर्ज भरण्याची आज शेवटची तारीख

बुलडाणा : सायकलवरून पत्र घेऊन येणारा पोस्टमन प्रत्येकाला आठवतो. हीच परंपरा भारतीय डाक विभाग आजही जपत असल्याचे डाकसेवक पदांच्या जागा भरण्यासाठी डाक विभागाने ठेवलेल्या उमेदवाराला सायकल चालविता येण्याच्या अटीवरून दिसून येते. राज्यभरात ग्रामीण डाकसेवक पदांच्या एकूण १ हजार ७८९ जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले असून, त्यासाठी ६ मे अंतिम मुदत देण्यात आली आहे. पूर्वी सायकलवरून पोस्टमन संपूर्ण गावात पत्र वाटप करायचे. पोस्टमनसाठी सायकल पूर्वीपासूनच महत्त्वाची साथीदार आहे. परंतु मोटारसायकल आल्यानंतर पोस्टमनकडील सायकलही हरवली गेली. बहुतांश पोस्टमन आज मोटारसायकलनेच फिरताना दिसतात. मात्र, भारतीय डाक विभाग पोस्टमनसाठी सायकलची परंपरा आजही कागदोपत्री जपत आहे. भारतीय डाक विभागाकडून राज्यभर ग्रामीण डाकसेवक पदांच्या एकूण १ हजार ७८९ जागा भरण्यासाठी दहावी उत्तीर्ण उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. ग्रामीण डाकसेवक पदांच्या उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची मुदत ६ मे ठेवण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांकरिता विविध अटी ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये उमेदवारांना संगणकाचे ज्ञान आवश्यक असून, किमान ६0 दिवस मूलभूत संगणक प्रशिक्षण घेतल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर ज्या ठिकाणी पोस्टमास्तर म्हणून निवड झाली, त्या गावात सदर उमेदवाराने राहणे आवश्यक आहे. याचबरोबर सर्वात महत्त्वाचे म्हणजे उमेदवाराला सायकल चालविता येणे आवश्यक असल्याची अट भारतीय डाक विभागाने ठेवली आहे. या अटीमुळे भारतीय डाक विभाग सायकलवर पत्र वाटप करण्याची परंपरा कागदोपत्री टिकवून ठेवत असल्याचे दिसून येत आहे.