डाकसेवक व्हायचे, तर सायकल शिका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2017 02:31 IST2017-05-06T02:31:16+5:302017-05-06T02:31:16+5:30

डाक विभागाची अट; ग्रामीण डाकसेवक पदांसाठी अर्ज भरण्याची आज शेवटची तारीख

If you want to be a mailer, then learn a bicycle! | डाकसेवक व्हायचे, तर सायकल शिका!

डाकसेवक व्हायचे, तर सायकल शिका!

बुलडाणा : सायकलवरून पत्र घेऊन येणारा पोस्टमन प्रत्येकाला आठवतो. हीच परंपरा भारतीय डाक विभाग आजही जपत असल्याचे डाकसेवक पदांच्या जागा भरण्यासाठी डाक विभागाने ठेवलेल्या उमेदवाराला सायकल चालविता येण्याच्या अटीवरून दिसून येते. राज्यभरात ग्रामीण डाकसेवक पदांच्या एकूण १ हजार ७८९ जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले असून, त्यासाठी ६ मे अंतिम मुदत देण्यात आली आहे.
पूर्वी सायकलवरून पोस्टमन संपूर्ण गावात पत्र वाटप करायचे. पोस्टमनसाठी सायकल पूर्वीपासूनच महत्त्वाची साथीदार आहे. परंतु मोटारसायकल आल्यानंतर पोस्टमनकडील सायकलही हरवली गेली. बहुतांश पोस्टमन आज मोटारसायकलनेच फिरताना दिसतात. मात्र, भारतीय डाक विभाग पोस्टमनसाठी सायकलची परंपरा आजही कागदोपत्री जपत आहे. भारतीय डाक विभागाकडून राज्यभर ग्रामीण डाकसेवक पदांच्या एकूण १ हजार ७८९ जागा भरण्यासाठी दहावी उत्तीर्ण उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. ग्रामीण डाकसेवक पदांच्या उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची मुदत ६ मे ठेवण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांकरिता विविध अटी ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये उमेदवारांना संगणकाचे ज्ञान आवश्यक असून, किमान ६0 दिवस मूलभूत संगणक प्रशिक्षण घेतल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर ज्या ठिकाणी पोस्टमास्तर म्हणून निवड झाली, त्या गावात सदर उमेदवाराने राहणे आवश्यक आहे. याचबरोबर सर्वात महत्त्वाचे म्हणजे उमेदवाराला सायकल चालविता येणे आवश्यक असल्याची अट भारतीय डाक विभागाने ठेवली आहे. या अटीमुळे भारतीय डाक विभाग सायकलवर पत्र वाटप करण्याची परंपरा कागदोपत्री टिकवून ठेवत असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: If you want to be a mailer, then learn a bicycle!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.