बोराखेडी येथे हायड्रोक्लोरिकची फवारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:34 IST2021-05-10T04:34:51+5:302021-05-10T04:34:51+5:30

गत काही दिवसांपासून तालुक्यासह ग्रामीण भागात कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. जिल्हा प्रशासनाकडून कोरोनाला अटकाव करण्यासाठी तथा कोरोनाला ...

Hydrochloric spray at Borakhedi | बोराखेडी येथे हायड्रोक्लोरिकची फवारणी

बोराखेडी येथे हायड्रोक्लोरिकची फवारणी

गत काही दिवसांपासून तालुक्यासह ग्रामीण भागात कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. जिल्हा प्रशासनाकडून कोरोनाला अटकाव करण्यासाठी तथा कोरोनाला हद्दपार करण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन लावण्यात आला असून, कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. तसेच फिजिकल डिस्टन्सिंग पाळण्यासह सॅनिटायझरचा जास्त प्रमाणात वापर व मास्क लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासह कोरोनाच्या तपासण्यांत वाढ करत लसीकरणावर जोर देऊन लसीकरण वाढविण्यात आले. यासह विविध प्रकारच्या उपाययोजना प्रशासनाकडून राबविण्यात येत आहे. तरीही परिस्थिती आटोक्यात येत नसल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. त्यामुळे कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी बोराखेडीच्या सरपंच आशा राहुल तेलंग यांच्या संकल्पनेतून गावात हायड्रोक्लोरिकची फवारणी करून गाव सॅनिटाइझ करण्याचे ठरविण्यात आले. यासाठी सरपंच आशा राहुल तेलंग, उपसरपंच सलिमा बी. अब्बास खान तसेच ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी एल. टी. उडदेमाळी व ग्रामपंचायत कर्मचारी रवी चव्हाण यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Hydrochloric spray at Borakhedi