पतीने फोडले पत्नीचे डोके
By Admin | Updated: June 30, 2014 02:10 IST2014-06-29T23:26:17+5:302014-06-30T02:10:07+5:30
शेती ठोक्याने देण्यास पत्नीने नकार दिल्याने पत्नीचे डोके फोडले;शेगाव तालुक्यातील मनसगाव येथील घटना.

पतीने फोडले पत्नीचे डोके
शेगाव : शेती ठोक्याने देण्यास पत्नीने नकार दिल्याने पत्नीचे डोके फोडल्याची घटना तालुक्यातील मनसगाव येथे काल २८ जून रोजी घडली. या प्रकरणी शेगाव ग्रामीण पोलिसांनी पतीविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत मनसगाव येथील सौ.रुख्मा दादाराव कराळे यांनी पो.स्टे.ला फिर्याद दिली की, घरची शेती ठोक्याने देण्यास नकार दिला. त्यामुळे पती दादाराव कराळे याने लाकडी काठी डोक्यावर मारुन डोके फोडून जखमी केले. याप्रकरणी शेगाव ग्रामीण पोलिसांनी फिर्याद तसेच वैद्यकीय प्रमाणपत्रावरुन दादाराव कराळे याच्याविरुध्द कलम ३२४, ५0४, ५0६ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे.