तूर खरेदीच्या मुहूर्तावरच आर्द्रतेचा खोडा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 01:44 PM2020-02-11T13:44:12+5:302020-02-11T13:44:44+5:30

‘एफएक्यू-नॉन एफएक्यू’च्या गोंधळाने तूर उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

Humidity become hurdle in toor procurment in Buldhana | तूर खरेदीच्या मुहूर्तावरच आर्द्रतेचा खोडा!

तूर खरेदीच्या मुहूर्तावरच आर्द्रतेचा खोडा!

Next

- ब्रम्हानंद जाधव 
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्ह्यात आठ ठिकाणी हमीभावाने तूर खरेदीला सुरूवात झाली आहे. परंतू खरेदीच्या मुहूर्तावरच आर्द्रतेमुळे तूर खरेदीला खोडा निर्माण होत आहे. ‘एफएक्यू-नॉन एफएक्यू’च्या गोंधळाने तूर उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
जिल्ह्यात ७६ हजार ५०७ हेक्टर क्षेत्रावर तूर पेरा आहे. सध्या अनेकांची तूर सोंगणी होऊन घरातही आली आहे. परंतू बाजारामध्ये तूरीला केवळ ४५०० ते ५ हजार रुपयांपर्यतच भाव मिळत आहे. त्यामुळे शासनाने ठरवरून दिलेल्या ५ हजार ८०० रुपये हमीभावाने तूरीची विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. केंद्र शासनाने जाहीर केलेल्या आधारभूत दराने तुरीची खरेदी करण्यासाठी १ जानेवारीपासून आॅनलाइन पद्धतीने नोंदणी सुरू करण्यात आली होती. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना नाफेड अंतर्गत तूर खरेदीची प्रतीक्षा लागलेली होती. दरम्यान, ८ फेब्रुवारी पासून जिल्ह्यातील आठ नाफेड केंद्रावर हमीभावाने तूर खरेदीला सुरूवात करण्यात आली. परंतू सुरूवातीच्या दोन दिवसातच अनेक शेतकºयांना आर्द्रतेच्या नावाखाली तूर विक्री न करता परत जावे लागले.
आर्द्रतेचे कारण दाखवून अनेकांची तूर खरेदी होत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. एफएक्यू दर्जाची नसल्याचे कारण दाखवले जात आहे. हमीभावाने तूर खरेदीला आद्रतेचे ग्रहण लागल्याने त्याचा फटका तूर उत्पादक शेतकºयांना बसत आहे.


खरेदी मर्यादेवर नाराजी
हमीभावाने तूर खरेदी करण्यासाठी शासनाने हेक्टरी सहा क्विंटल नऊ किलोची मर्यादा घालून दिलेली आहे. तूर खरेदीसाठी असलेल्या मर्यादेमुळे शेतकºयांमध्ये तीव्र नाराजी दिसून येत आहे. यात तूर उत्पादक शेतकºयांचे मोठे होत आहे.


नोंदणीसाठी पाच दिवस
हमीभावासाठी १ जानेवारीपासून तूर खरेदीची नोंदणी सुरू झालेली आहे. याची मुदत १५ फेब्रुवारीपर्यंत असल्याने आता शेतकºयांकडे अवघे पाच दिवस उरले आहेत. त्यामुळे नोंदणीसाठी शेतकºयांची लगबग वाढली आहे.

Web Title: Humidity become hurdle in toor procurment in Buldhana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.