शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

सिलिंडर पेटल्याने घराला आग; चार जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2020 12:55 PM

Khamgaon News घराला आग लागून चौघे जण भाजल्याने जखमी झाले. 

लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : स्थानिक मस्तान चौक भागातील पोलीस चौकीजवळील एका घरात अचानक गॅस सिलिंडरने पेट घेतल्यामुळे घराला आग लागून चौघे जण भाजल्याची घटना शुक्रवारी  सकाळी घडली.मस्तान चौक भागातील फाटकपुरामधील रहिवासी शे. अहमद शे. बुन्हाण (७०) यांच्या घरात  सकाळी १० वाजता अचानक गॅस सिलिंडरने पेट घेतला. त्यामुळे स्वयंपाक घरात आग लागल्याने  आगीत घरामधील शे. अहमद शे. बुऱ्हाण, मो.तौफीक मो.रफीक, मो. शफी शे. अहमद (४०) व रूबिना अंजुम मो. शफी हे चौघे जण भाजल्याने जखमी झाले. घरात आग लागल्याचे समजताच परिसरातील नागरिकांनी व मस्तान चौक पोलीस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांनी घराकडे धाव घेऊन तातडीने आग विझविण्यासाठी प्रयत्न केले.घटनेची माहिती मिळताच न.प. अग्निशामक दलानेही घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळविल्याने पुढील अनर्थ टळला. या आगीमध्ये घरातील वस्तू आणि इलेक्ट्रीक वायरिंग जळून खाक झाले. यातील शे. अहमद शे. बुऱ्हाण व मो. तौफीक मो. शफी हे दोघे ३५ते ४० टक्के  भाजल्याने त्यांना अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. 

टॅग्स :khamgaonखामगावfireआग