शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

फेरीवाल्यांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण

By admin | Updated: June 6, 2015 00:45 IST

नांदुरा पालिकेद्वारे होणार सर्वेक्षण; बँकेमार्फत आर्थिक मदतही मिळणार.

किशोर खैरे / नांदुरा ( जि. बुलडाणा) : नांदुरा शहरात जे नागरिक रस्त्यावर बसून व्यवसाय करीत आहेत तसेच रेगडीवर, सायकलवर गावात हिंडून किंवा बाजारात बसून व्यवसाय करतात अशा छोट्या व्यवसाईकदारांचा नांदुरा नगरपालिके मार्फतबायोमेट्रीक पध्दतीने सर्व्हे करीत असल्याची माहिती प्रकल्पाच्या सहसंचालिका सौ. वैशाली पहुरकर यांनी ह्यलोकमतह्णशी बोलतांना दिली. राष्ट्रीय व राज्य नागरी उपजिवीका अभियाना अंतर्गत हे सर्वेक्षण होत आहे. शहरातील फेरीवाल्यांना त्यांची शैक्षणिक पात्रता, र्मयादीत कौशल्य, आर्थिक पत यामुळे व्यवसायाच्या संधी कमी असतात तसेच असंघटीत व स्वयंरोजगार करणार्‍या फेरीवाल्यांना व्यवसायाची संधी मिळावी. त्यात प्रामुख्याने शहर फेरीवाला समिती स्थापन करणे, फेरीवाल्यांचे सर्व्हेक्षण करुन ओळखपत्र देणे, आराखडा तयार करणे, फेरीवाल्यांना पायाभूत सुविधा देणे, फेरीवाल्यांना प्रशिक्षण देवून त्यांचे कौशल्याचा विकास करणे, वित्तीय समायोजन करणे, समाजात पत सुधारणे, सामाजिक सुरक्षा योजनांची सांगड घालणे असे या योजनेचे स्वरुप आहे. फेरीवाल्यामध्ये स्थिर फेरीवाला व फिरता फेरीवाला असे प्रकार असतील. स्थिर फेरीवाले ज्या जागेवर व्यवसाय करतात त्यांना तेथेच व्यवसायाकरिता जागा द्यावी, त्यांना आर्थिक मदत देवून पाणीपुरवठा, दिवाबत्ती, स्वच्छतागृहे, कचराकुंड्या, रात्री माल साठविण्यासाठी संयुक्त गोदामाची व्यवस्था, तात्पुरते शेड, वाहनतळ, विशीष्ट व्यवसायाकरिता विशेष रंगाच्या गाड्या उपलब्ध करुन देण्यात येतील. फेरीवाल्याचे प्रशिक्षण शिबिर घेवून त्यांचे हक्क, जबाबदार्‍या, विशेष धोरणे, अन्न सुरक्षा, स्वच्छता याबाबत माहिती देण्यात येईल. या प्रशिक्षणासाठी येणारा खर्च शासन करेल. नांदुर्‍यात मेन रोडवर बसून विक्री करणार्‍या छोट्या व्यावसायीकांना पोलिसांकडून नेहमीच त्रास दिला जातो अशी ओरड ते व्यवसायीक नेहमी करतात. परंतु या नवीन नियमानुसार त्यांना जागा मिळणार असल्याने आता पोलिसांचा ससेमिराही मागे राहणार नाही.