शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

घरपोच सिलिंडर, पण वजनाबाबत अनभिज्ञता !

By admin | Updated: June 6, 2015 00:49 IST

खामगाव शहरातील वास्तव; ग्राहक जागृती होणे गरजेचे.

खामगाव: सिलिंडरची घरपोच सेवा अनेक कंपन्यांनी सुरू केली आहे; मात्र या सिलिंडरचे अधिकृत वजन व प्रत्यक्षात मिळणारे वजन याची खातरजमा कुणीही करीत नसल्याची बाब ह्यलोकमतह्णने केलेल्या सर्वेक्षणात समोर आली आहे. खामगाव शहरात एका कंपनीच्या दोन एजन्सीकडून शहरातील सुमारे ४५ हजारावर गॅस ग्राहकांना गॅसचे वितरण केले जाते. यामध्ये बहुतांश ग्राहक घरपोच सिलिंडरची मागणी करतात. घरपोच सिलिंडर मिळाल्यानंतर कुणीही या सिलिंडरचे वजन करीत नसल्याचे धक्कादायक वास्तव असल्याने ग्राहकांना सिंलिडरसाठी योग्य ती रक्कम मोजल्यानंतरही नियमानुसार सिलिंडरचे वजन मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. घरगुती अनुदानित गॅस सिलिंडरसाठी ४७0 रुपये घेतले जातात. घरगुती गॅसचे वजन १४.६ किलो असते; मात्र अनेकदा सिलिंडरचे वजन कमी भरत असल्याच्या कुरबुरी होतात; मात्र कुणीही तक्रार करण्यास पुढे येत नाही. स्वयंपाकासाठीच्या गॅसच्या किमती व सिलिंडरची र्मयादित संख्या यामुळे सामान्य नागरिकांचा जीव टांगणीला लागला असतानाच गॅसचोरीची एकेक प्रकरणे पुढे येऊ लागली आहेत. गॅस घरपोच देणारा कर्मचारी भरलेल्या सिलिंडरमधून बेमालूमपणे गॅस काढून कमी वजनाचे सिलिंडर देत असल्याचा प्रकार अनेकदा उघड झाला आहे. तर घरगुती गॅस सिलिंडरमधून गॅस काढून तो व्यावसायिक सिलिंडरमध्ये भरुन तसेच वाहनात भरुन जादा दराने विक्री करण्याचे प्रकारही शहरात समोर आले आहेत. त्यामुळे कमी वजनाचा गॅस आपल्या माथी मारुन एजंटने फसवणूक केल्याची नागरिकांची भावना झाली आहे. अगोदरच महागाई त्यात अशा प्रकाराने ग्राहक मेटाकुटीला आले आहेत. त्यामुळे गॅस सिलिंडर देताना त्याचे वजन करून दिले पाहिजे; पण किती एजन्सीज हा नियम पाळतात, हा मोठा प्रश्न आहे. सिलिंडरच्या वजनाबाबत अनेक ग्राहकांशी संवाद साधला असता सर्वांंनीच वजन करीत नसल्याचे सांगितले. ग्राहकांच्या अशा बेपर्वा वृत्तीमुळे एजन्सीधारकांचे फावत आहे. येणार्‍या काळात ग्राहकांनी जागृत राहणे गरजेचे आहे.