चिखली (जि. बुलडाणा): लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे संपूर्ण विदर्भात १ ऑगस्ट रोजी विदर्भ निर्धार दिवस पाळल्या जाणार असून यानिमित्ताने चिखली येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात दुपारी १२ वाजता वीज बिलांची होळी करण्यात येणार असल्याची माहीती विदर्भ राज्य आंदोलन समितीने दिली. विदर्भातून उत्पादीत होणार्या वीजेवर मुंबई मधील मॉल्स्, पंचतारांकीत हॉटेल्स्, उद्योग-धंदे बहरलेत; मात्र, येथील शेतकरी वीज भारनियमनाचा बळी ठरतो आहे. कृषीपंपांना वीज पुरवठा नियमित मिळत नसल्यामुळे पिकांना पाणी देणे शक्य होत नाही परिणामी कृषी उत्पादनात घट होते. हे दुष्टचक्र थांबविण्यासाठी स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती हाच एकमेव पर्याय आहे. त्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समिती जनजागरण व जनसंघटन करीत असून स्वतंत्र विदर्भ राज्याचा मुद्दा ही जनतेची मागणी व्हावी यासाठी या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ.दिपक मुंढे, रेणुकादास मुळे, दामोधर शर्मा, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास कणखर, उत्तमराव मुंढे, समाधान कणखर यांनी केले आहे.
निर्धार दिवसानिमित्त वीज बिलाची होळी करणार
By admin | Updated: July 31, 2015 00:02 IST
विदर्भ राज्य आंदोलन समितीचे आंदोलन.
निर्धार दिवसानिमित्त वीज बिलाची होळी करणार
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}